तरुण भारत

रत्नागिरी : खेड एसटी बसचे ब्रेक निकामी, वाहतुकीचा खोळंबा

प्रतिनिधी / खेड


खेड बसस्थानक ते तीनबत्तीनाका मार्गावर अचानक एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक पूर्ववत करताच वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
येथील बसस्थानकात जाणाऱया एमएच 14/बीटी 2443 या कमांकाच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावरील रस्त्याच्या कडेला बस उभी करण्यात आली. अरूंद रस्त्यामुळे वाहने मार्गस्थ होण्यास अडथळे निर्माण झाले. या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध न झाल्याने अखेर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर वाहतुकीची कोंडी फोडली. या मार्गावर बऱयाचवेळा वाहने कुठल्याही स्थितीत उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची कुठलीच व्यवस्था नाही. त्यातच गजबजलेला मार्गदेखील अरूंदच असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता रूंदीकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisements

Related Stories

लोटेतील ‘सुप्रिया’ कंपनीत स्फोट

Patil_p

हिमशिखरालाही धडक देत ‘तिने’ शोधले पतीचे पार्थिव!

triratna

रत्नागिरी : भाजप प्रदेश धनगर समाज प्रमुखपदी अँड. मिलींद जाडकर

triratna

रत्नागिरी जिह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढला

Patil_p

जिल्हय़ातील 360 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाबाबत उत्सुकता शिगेला

Patil_p

रत्नागिरी : नाराज शिवसैनिकांची आमदारांनी काढली समजूत

triratna
error: Content is protected !!