तरुण भारत

पिण्याच्या पाण्यासाठी पाच्छापुरात घागर मोर्चा

संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले ठाळे : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

वार्ताहर/ यमकनमर्डी

Advertisements

पाच्छापूर येथे गुरुवारी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. येथील बसस्थानकापासून महिलांनी मोर्चाला प्रारंभ केला. दरम्यान संतप्त झालेल्या महिला ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

राजालखमगौडा जलाशयातून बेळगाव शहरासाठी गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाच्छापूर गावालाही पाणी पुरवठा केला जात होता. सुमारे 10 हजारपेक्षा लोकसंख्या असलेल्या या गावाला 8 ते 9 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावाशेजारीच राजालखमगौडा जलाशय आणि मार्कंडेय नदी असून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱयांना ही बाब निदर्शनास आणून निवेदनही देण्यात आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

तात्काळ हिडकल जलाशयातून पिण्याच्या पाण्याची नूतन पाईपलाईन काम सुरू न केल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. तसेच जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, हुक्केरी तालुका पंचायत अधिकारी मिश्रीकोटे, देशपांडे यांनी याची माहिती घेऊन उपाययोजना हाती घेण्यात येईल, असा भरवसा दिला.  त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

यावेळी बेळगाव जिल्हा निजद अध्यक्ष जाकीर नदाफ, बसवण्णी अंबिगेर, जाकीर हुसेन, नबिसाब लंगोटी, दस्तगिर पाटील, गणपती काकडे, महेश होगार, सिद्दप्पा सिडलीहाळ, अमिना मुजावर, बिबव्वा सिडलीहाळ यांच्यासह गावातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

केएलईमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

Amit Kulkarni

बँकांचे कर्मचारी दोन दिवस संपावर

Patil_p

‘गणेश महोत्सव’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

Amit Kulkarni

निपाणी पालिकेतर्फे विनामास्क कारवाईला गती

Omkar B

मौलाना सिद्दीकी यांना खोटय़ा आरोपाखाली अटक

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रामपंचायतीतर्फे प्रत्यक्ष विकासकामांचा श्रीगणेशा

Amit Kulkarni
error: Content is protected !!