तरुण भारत

बेशिस्त पार्किंग केल्यास कठोर कारवाई

प्रतिनिधी/ पणजी

पणजीवासियांना सहन कराव्या लागणाऱया पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनपाने कडक पावले उचलली असून नो पार्किंग किंवा फुटपाथ आदी ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.

महापौर उदय मडकईकर यांच्या कार्यालयात त्यासंदर्भात झालेल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, पालिका आयुक्त संजित रॉड्रिगीश, वाहतूक उपअधिक्षक सलीम शेख यांच्यासह वाहतूक निरीक्षक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पणजीत खास करून रात्रीच्या वेळी अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे त्रास पणजीवासियांना सहन करावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे आल्या होत्या. त्यांची दखल घेत मनपाने वरील कारवाई हाती घेतली असून वाहतूक पोलिसांनी त्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

हा कारवाई कायम चालूच राहणार असून बुधवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 54 दुचाकी आणि 17 चारचाकी वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. त्याद्वारे सुमारे 28 हजार रुपये वसूल करण्यात आले.

Related Stories

कर्नाटकातून आडमार्गाने गोव्यात येणाऱयांची सरकारकडून गंभीर दखल

Omkar B

मांद्रे मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर

Omkar B

मडगाव पालिकेच्या कचरापेटय़ा मोठय़ा प्रमाणात पडून

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जीवरक्षकांचे आमरण उपोषण मागे

Omkar B

पणजी आजपासून बनणार मायानगरी

Amit Kulkarni

गोव्याचे आमदार रोहन खवंटे यांना अटक आणि सुटका

Rohan_P
error: Content is protected !!