तरुण भारत

कराड नगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा

प्रतिनिधी/ कराड

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत येथील नगरपालिकेने लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

Advertisements

कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्षे देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावर्षी हॅटट्रीक साधण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 24 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 5 या वेळेत जिंगल स्पर्धा, शॉर्टफिल्म स्पर्धा, पथनाटय़ स्पर्धा, भित्तिचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, स्वच्छ भारत अभियान, वैभवशाली कराड, कचरा वर्गीकरण, बदलते कराड, सिंगल युज प्लास्टिक, वेस्ट आज बेस्ट हे स्पर्धेचे विषय आहेत.  

प्रथम तीन क्रमांकांना 5000, 3000 व 1000 रूपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येईल. उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱयांना नगरपरिषदेच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

अधिक माहिती माहितीसाठी नगरपालिकेचा शहर अभियान व्यवस्थापन कक्ष (बचत गट) गीतांजली यादव, दीपाली दिवटे, गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

मालवणात दोन दिवसात 12 जण दाखल

NIKHIL_N

सातारा : कोयना खोऱ्यात 2.4 रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का

triratna

कोरोनावरील भारतीय लस स्वातंत्र्य दिनी रुग्णसेवेत

Shankar_P

शेती नुकसानीचे तीन प्रकारात पंचनामे

NIKHIL_N

रत्नागिरी : या तालुक्यातील काेराेना रुग्णांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयातच होणार उपचार – आ. योगेश कदम

triratna

1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी परदेशी नागरिकास अटक

triratna
error: Content is protected !!