तरुण भारत

गुलबर्गा विद्यापीठ दीक्षांत समारंभ : शुक्रवारी १५,०२९ विद्यार्थी पदवीधर होणार

गुलबर्गा/प्रतिनिधी

गुलबर्गा विद्यापीठाच्या ३८ वा वार्षिक दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडणार आहे. तयावेळी तब्बल १५०२९ विद्यार्थ्यांना विद्यापीठाची पदवी प्राप्त होणार आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण ८२ विद्यार्थी एकूण १५५ सुवर्णपदके पटकावली असून नऊ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसेही देण्यात येणार असल्याचे कुलगुरू चंद्रकांत यतनूर यांनी सांगितले.

११० महिला पदक पुरस्कारांच्या यादीत आहेत तर एकूण ७७५१ महिला विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी मिळेल, असेही ते म्हणाले. दीक्षांत समारंभाची सुरुवात सामाजिक व आर्थिक बदल संस्थेचे संचालक एस. मधेश्वरन यांच्या भाषणाने होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल वजुभाई वाला असतील.

Advertisements

Related Stories

परीक्षेबाबत दोन दिवसात निर्णय घेणार

Amit Kulkarni

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या चौघांना सीसीबीकडून अटक

triratna

निवृत्त पोलिसांनाही मिळणार ओळखपत्रे

Patil_p

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून

Amit Kulkarni

पॅसेंजर बंदमुळे प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

बेंगळूर: एमएएचई २५ हजार विद्यार्थ्यांचे करणार मोफत लसीकरण

triratna
error: Content is protected !!