तरुण भारत

वीज बिल : नाकर्त्या ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

प्रतिनिधी/सांगली

वीज बिलाबाबत दिलेला शब्द फिरवून महाविकासआघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकारचे ”फेल्युअर”आहे. याची जबाबदारी स्विकारत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. वीज बिले फाडून शासनाचा निषेधही यावेळी करण्यात आला. येथील मारुती चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, कोरोनामुळे सरकारने तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाउन जाहीर केले होते. त्यामुळे अनेकांना आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले होते.सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजकांनाही फार मोठा फटका बसला होता.अशा अडचणीच्या काळातही वीज वितरण कंपनीने नागरिकांना भरमसाठ बिले देऊन मोठा शॉक दिला होता. याविषयी सरकारच्याविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी या आंदोलनात शहरजिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, शेखर इनामदार,प्रकाश बिरजे, युवर बावडेकर, मुन्ना कुरणे, गौतम पवार, सुब्राव मद्रासी, कल्पना कोळेकर, स्मिता पवार, ज्योती कांबळे, पांडुरंग कोरे,श्रीकांत शिंदे, लक्ष्मण नवलाई, केदार खाडिलकर, सतीश खंडागळे,जगन्नाथ ठोकळे,विजय घाटगे,विशाल पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सहकारात सातत्यासाठी पीआर पाटील यांच्या सारखी माणसे घडावी लागतात – खा.शरद पवार

Shankar_P

सांगली : रेल्वे प्रवाशाला लुटणारे तिघे जेरबंद

triratna

सांगली : कडेगावचे नगरसेवक नितिन शिंदेचा आमरण उपोषणाचा इशारा

Shankar_P

मिरज तालुक्यातील ‘या’ गावांना क्षारपड जमिनींसाठी 27.73 कोटींचा निधी

triratna

कामाचा आलेख उंचावण्याचे वाळवा ‘महसूल’समोर आव्हान

triratna

ह.भ.प बंडातात्या कराडकरांची मुक्तता करा – भाजपची मागणी

Shankar_P
error: Content is protected !!