तरुण भारत

सोलापूर : माढा तालुक्यात नवे २१ कोरोना बाधित

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात आज २१ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून कुर्डुवाडी, टेंभुर्णी, वेणेगाव, तुळशी, सापटणे टे, पिंपळनेर, लव्हे, लऊळ येथे हे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

तालुक्यात माढा येथे कुर्डुवाडी येथे ३, टेंभुर्णी येथे १०, वेणेगाव येथे १, तुळशी येथे १, सापटणे टे येथे १, पिंपळनेर येथे ३, लव्हे येथे १, लऊळ येथे १ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

Advertisements

तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ३४५१ झाला असून यामधील ३१८० बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित २०७ जणांवर उपचार सुरु असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले. दिवाळी नंतर ग्रामीण भागात तालुक्यातील विविध भागात बाधित रुग्ण आढळत आहेत. नागरिकांनी गाफील न राहता सतर्क राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Related Stories

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात २७ तर ग्रामीणमध्ये ८०१ नव्या कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील 71904 कामगारांच्या खात्यात चौदा कोटी जमा

Abhijeet Shinde

”पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

Abhijeet Shinde

सोलापूर : दिवाळीपर्यंत विकास कामाचा अनुशेष भरून काढू : आ. कल्याणशेट्टी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!