तरुण भारत

त्या तलावांची एल. के. अतिक यांच्याकडून पाहणी

कार्यकारी अधिकाऱयांची केली प्रशंसा, तालुक्यातील कामांबद्दल केले कौतुक

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टिने आता मोठय़ा प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. परिणामी अनेक तलावांची खोदाई करुन त्यामध्ये पाणी साठविण्याचे काम करण्याची धडपड सुरु आहे. जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक हे बेळगाव येथील अधिकाऱयांची बैठक घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी खास करुन हिंडलगा जेलमधील तलावांच्या पाहणी केली. यावेळी उद्योग खात्री योजनेतून या तलावांची कामे पाहून त्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांची प्रशंसा केली व कामाबद्दल कौतुक केले.

हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यक्षेत्रातही दोन तलावांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका तलावाचे काम पूर्ण झाले आहे. तर  दुसऱया तलाव खोदाई करण्यासाठीचे काम सुरू आहे. त्यामुळे याचा फायदा जेलमधील कैद्यांबरोबरच इतरांनाही होणार आहे. हे काम कशा प्रकारे झाले आणि त्यासाठी कोणत्या प्रकारे याचा लाभ कैदी व शेतकऱयांना होणार याबाबत त्यांनी चर्चा केली.

एकीकडे पाणी पातळी घटत चालली असून ही समस्या भविष्यात धोका निर्माण करणारी आहे. यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने विविध योजना राबवून पाणी जमिनीत कसे झिरपता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कोटय़ावधी लीटर पाणी वाया जात आहे. त्याचे संगोपन करुन त्याचाउपयोग सर्वसामान्यांना कसा होईल याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.

दरम्यान बेळगाव तालुक्मयात मात्र पाणी जिरविण्यासाठी विविध तलावांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या तालुक्मयात 42 तलावांची निर्मिती करण्याचा ध्येय तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांना बोलून दाखविली. त्यांनी याबाबत त्यांचे कौतुक केले असून अशाच प्रकारे काम करत रहा, असा सल्लाही दिला आहे. 

पाण्यासाठी अनेक गावांमध्ये भटकंती करावी लागते आणि लागत आहे. मात्र त्यावर आळा आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्मयात जोरदार प्रयत्न करत आहोत. याचबरोबर पुढील वर्षांपर्यंत आम्ही अनेक तलावांना पुनर्रूज्जीवन करण्यासाठीचे काम हाती घेतले आहे, असेही कलादगी यांनी सांगितले. याचबरोबर तलावांमध्ये असणाऱया वृक्षांचे संगोपन करुन तलावाभोवती आम्ही झाडेही लावणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ही कामे उत्तम पध्दतीने झाली असून यापुढेही अशाचप्रकारे तालुक्मयाचा विकास करा, अशा सूचना केल्या.

यावेळी जिल्हा पंचायतचे उपकार्यदर्शी मुळळ्ळी, अभियंते महादेव बिरादार, तालुका पंचायतीचे सहसचिव राजेंद्र मोरबद, पिडीओ गंगाधर, तांत्रिक संयोजक नागराज यरगुद्दी, तांत्रिक सहाय्यक मालतेश पाटील, ग्रा. पं.चे प्रभारी सेपेटरी संतोष यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

झारखंडच्या गुन्हेगारांना बेंगळूर पोलीस घेणार ताब्यात

Amit Kulkarni

अलतगा येथील लक्ष्मीदेवी यात्रा पुढील वषी भरविणार

Amit Kulkarni

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रारंभ

Amit Kulkarni

खडेबाजार शहापूर परिसरात पेव्हर्सच्या खालून सांडपाणी

Amit Kulkarni

शिवाजीनगर दुसरी गल्लीत महिला मंडळाची स्थापना

Omkar B

मध्य रेल्वेच्या पॅसेंजर, धावताहेत कर्नाटकात

Patil_p
error: Content is protected !!