तरुण भारत

बेळगाव विमानतळ देशात अव्वल

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊननंतर देशातील एक अव्वल विमानतळ म्हणून बेळगावचा समावेश झाला आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा सर्वोच्च प्रवासी संख्या गाठणारे बेळगाव हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे. सप्टेंबर महिन्यात या विमानतळावरून 23 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. मागील वषीच्या सप्टेंबर महिन्याच्या प्रवासी संख्येपेक्षा 2 हजार प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

बेळगाव शहरापासून 20 कि. मी. अंतरावर असणाऱया सांबरा येथे विमानतळ आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व कोकण अशा सीमा बेळगाव जिल्हय़ाला लागल्या असल्याने प्रवाशांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 23 हजार 170 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केला आहे. मागील वषी सप्टेंबर महिन्यात 21 हजार 339 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे मागील वषीच्या तुलनेत यावषी 9 टक्के प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

कोरोनामुळे 23 मार्चपासून देशांतर्गत विमानसेवा बंद होती. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार 25 मे पासून पुन्हा विमान सेवेला सुरुवात झाली. शेजारील कोल्हापूर व हुबळी या विमानतळावरून विमानसेवा बंद असल्याने त्याचा फायदा बेळगावला झाला. त्यामुळे प्रवासी संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. जून महिन्यात 10 हजार 200 प्रवाशांनी विमान प्रवास केला. मे ते ऑगस्ट या दरम्यान 42 हजार 700 प्रवाशांनी प्रवास केला.

प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस व रेल्वेचा प्रवास टाळत विमान सेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळेच सध्या नऊ शहरांना थेट विमानसेवेने जोडण्यात आले आहे. मुंबई, बेंगळूर, पुणे, हैद्राबाद, तिरुपती, कडप्पा, म्हैसूर, इंदूर, अहमदाबाद या शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. तर चेन्नईला म्हैसूरमार्गे विमान प्रवास करता येत आहे. नोव्हेंबर महिन्यात 30 हजार प्रवासी टप्पा गाठण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Stories

एपीएमसीमध्ये सलग तिसऱया दिवशीही गोंधळ

tarunbharat

सामाजिक अंतर राखत साजरी झाली बकरी ईद

Patil_p

कर्नाटक राज्य शिक्षणमंत्र्यांनी एसएसएलसी परीक्षा केंद्राला दिली भेट

triratna

हंगरगे मरगाई देवी मंदिराचा भूमीपूजन सोहळा उत्साहात

Patil_p

रुग्णवाहिका पेटविणाऱया 13 जणांना कोरोना

Patil_p

खानापूर शहर परिसरात तुळशी विवाह मंगलमय वातावरणात

Patil_p
error: Content is protected !!