तरुण भारत

माजी ऑलिम्पिक हॉकीपटू एम. पी. सिंग यांना गावसकर फौंडेशनतर्फे मदत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रातील गरजू खेळाडूंना आर्थिक मदत मिळण्याच्या हेतूने चॅम्प्स फौंडेशनची स्थापना केली आहे. या फौंडेशनतर्फे आता भारताचा माजी ऑलिम्पिक हॉकीपटू मोहिंदरपाल सिंग यांना आर्थिक मदत या फौंडेशनतर्फे दिली जाणार आहे.

माजी हॉकीपटू एम. पी. सिंग यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासले आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. एम. पी. सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून ते सध्या डायलिसिसवर आहेत. त्यांची मूत्रपिंडे पूर्णपणे निकामी झाली असून या हॉस्पिटलतर्फे किडनी डोनरसाठी आवाहन करण्यात आले आहे. एम. पी. सिंग यांच्या प्रकृतीबद्दल गावसकर फौंडेशनतर्फे संपूर्ण माहिती घेण्यात आली असून त्यांना वैद्यकीय इलाजासाठी या फौंडेशनने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. 1988 च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय हॉकी संघामध्ये एम. पी. सिंग यांचा समावेश होता. गावसकर चॅम्प्स फौंडेशनतर्फे भारतीय क्रीडाक्षेत्रातील विविध 21 खेळाडूंना वैद्यकीय इलाजासाठी प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत दिली जात असल्याचे या फौंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

आरसीबीचे प्रशिक्षक माईक हेसन मायदेशी रवाना

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक चाचणी स्पर्धा मार्चपासून

Patil_p

टीम इंडिया दौऱयावर न आल्यास निराशा होईल : लाबुशाने

Patil_p

आयपीएल खेळणारा तो एकमेव पाकिस्तानी कोण?

tarunbharat

अहो आश्चर्यम्! विराट एबीडीला ‘बिस्कीट’ म्हणतो!

Patil_p

भारताचा अमित पांघल बनला जागतिक अग्रमानांकित बॉक्सर

Patil_p
error: Content is protected !!