तरुण भारत

कोल्हापूर : माजी नगरसेवकासह आठ जणांवर गुन्हा

कसबा बावडा येथील घटना, शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

पूर्ववैमनस्यातून कसबा बावडा येथे गुरुवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील दोघेजण जखमी झाले. माजी नगरसेवक श्रावण फडतरेंसह आठ जणांवर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल झाले. फिर्याद प्रवीण दगडू लोंढे (वय 27) आणि संदीप महालू वडर (वय 37) यांनी दिली.

कसबा बावडा येथील भगतसिंग वसाहतीजवळील चौकात दोन गटात गुरुवारी 19 रोजी हाणामारी झाली. तलवार, काठÎांचा वापर झाल्याने यात दोघे जण गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. जखमी प्रवीण लोंढेने दिलेल्या फिर्यादीनुसार पूर्वीच्या भांडणातून संशयित संदीप वडर, बहीण शुभांगी (पूर्ण नाव पत्ता समजले नाही) या दोघांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच जखमी संदीप वडर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार `यापूर्वीचा दाखल गुन्हा मागे घेण्याबाबत सांग’, अशी धमकी देत संशयित माजी नगसेवक श्रावण फडतरे, प्रविण लोंढे, विकी लोंढे, योगेश पाटवळे, विवेक भोसले, विशाल भोसले (पूर्ण नाव पत्ता समजले नाही) या सहा जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार संबधित आठ संशयितावर गुन्हा दाखल झाला.

Related Stories

कोल्हापुरी कलेचा फिल्मफेअरने सन्मान

Abhijeet Shinde

एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण; एकच मागणी, शासनात विलिनीकरण

Abhijeet Shinde

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे उद्यापासून वार्षिक चित्र प्रदर्शन

Abhijeet Shinde

बहिरेश्वरच्या लोकनियुक्त सरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर

Abhijeet Shinde

सातारा : राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला कामकाजाचा आढावा

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात 2 बळी, 35 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!