तरुण भारत

उत्तराखंडात कोरोना रुग्णांनी ओलांडला 70 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 512 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 70 हजार 205 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,994 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 512 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 16, बागेश्र्वर 14, चमोली 45, चंपावत 12, देहरादून 204, हरिद्वार 39, नैनिताल 43, पौरी गरवाल 35, पिथोरगड 27, रुद्र प्रयाग 20,तेहरी गरवाल 23, यू एस नगरमधील 22 आणि उत्तर काशीमधील 12 जणांचा समावेश आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल 585 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 64,939 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.72 टक्के इतके आहे. तर सध्या 4 हजार 051 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1138 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्यांकडून गोळीबार; भारतीय जवान शहीद

datta jadhav

मोहाली, लुधियाना आणि जालंधरमध्ये होणार चार नवीन कोविड टेस्टिंग लॅब

pradnya p

देशात मागील 24 तासात 48,661 नवे कोरोना रुग्ण, 705 मृत्यू

datta jadhav

मास्कसाठी कायदा करणारे ‘राजस्थान’ देशातील पहिले राज्य : अशोक गेहलोत

pradnya p

संपूर्ण लोकसंख्येसाठी लसीकरण आवश्यक नाही!

Patil_p

सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या धावणार

datta jadhav
error: Content is protected !!