तरुण भारत

ऍपलच्या ‘ऍप स्टोअर’ कमीशनमध्ये घट

कमीशन 30 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्याचे संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिग्गज टेक कंपनी ऍपल आपल्या नवीन डेव्हलपर्स प्रोग्रॅमअंतर्गत ऍपल ऍप स्टोअर कमीशन 30 वरुन 15 टक्के करणार असल्याची माहिती आहे. ऍपलने या संदर्भात सध्या घोषणा केली असली तरी नवीन नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार असल्याचे ऍपलने सांगितले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार यामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपर्सला फायदा होणार असल्याची माहिती असून कंपनीच्या या नवीन योजनेंतर्गत किती डेव्हलपर्स येणार आहेत, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अधिकृत माहितीनुसार सदरचा प्रोग्रॅम लागू झाल्यानंतर वर्षाच्या पातळीवर ऍपमधून 7.41 कोटीची कमाई होण्याचे संकेत आहेत. वर्ष 2020 मधील पहिल्या सहामाहीत ऍपल ऍप स्टोअरने वर्षाच्या आधारे जागतिक पातळीवर 2,43,300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई साधारणपणे ऍप परचेज, सब्सक्रिप्शन आणि पेड ऍपसह गेमच्या मदतीने झाली आहे. हाच आकडा 2019 मध्ये 27 टक्के अधिक राहिला आहे.

Related Stories

तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी वधारला

Patil_p

दूरसंचार कंपन्यांचे 82 लाख ग्राहक घटले

Patil_p

बँक-आयटी कंपन्यांच्या विक्रीने सेन्सेक्सची घसरण

Patil_p

अमेरिकेकडून स्टील स्ट्रिप्स व्हील्सला मिळाली ऑर्डर

Patil_p

रियलमी नार्जोला दमदार प्रतिसाद

omkar B

शेअर बाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीत

Patil_p
error: Content is protected !!