तरुण भारत

शेअर बाजारात पुन्हा परतले तेजीचे वातावरण

विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह : एचडीएफसी, कोटक बँकांना पसंती

वृत्तसंस्था / मुंबई

मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींच्या परिस्थितीनुसार भांडवली बाजाराने चालू आठवडय़ात गुरुवारच्या सत्रात मागील चार दिवसांतील तेजी खंडित करुन सेन्सेक्स 580 अंकांनी कोसळत बंद झाला होता. याच वातावरणाचा प्रभाव म्हणून जागतिक गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा सकारात्मक कल कायम ठेवल्याने चालू आठवडय़ाचा शेअर बाजाराचा समारोप पुन्हा तेजीसोबत झाला आहे.

जागतिक बाजारातील तेजीच्या प्रभावामुळे सेन्सेक्समधील एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागास गुंतवणूकदारांनी पसंती दर्शवली आहे. या मजबूत स्थितीच्या कामगिरीने दिवसअखेर सेन्सेक्स 282.29 अंकांनी वधारुन निर्देशांक 43,882.25 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 87.35 अंकांच्या तेजीसह 12,859.05 वर स्थिरावला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक 9 टक्क्यांपेक्षा अधिक वधारले आहेत. सोबत टायटन, बजाज फायनान्स, कोटक बँक, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया आणि एनटीपीसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, सन फार्मा, ऍक्सिस बँक, ओएनजीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

दिवाळी सप्ताहात बीएसई सेन्सेक्स जवळपास 1 टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिला आहे. तसेच तिमाहीचा अहवाल सादर करण्याचे सत्रही समाप्त होण्यासोबत गुंतवणूकदारांनी आर्थिक सुधारणा व बाजार मूल्यांकनावर भर दिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. अन्य बाजारात आशियातील चीनचा शांघाय कंपोजिट, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी तेजीत राहिला. जपानचा निक्की घसरणीसह बंद झाला आहे.

पुन्हा दुसऱया लाटेची धास्ती

भारतात कोविडची पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा प्रभाव येत्या काळात भांडवली बाजारांवर दिसेल.

Related Stories

डिसेंबरपर्यंत ट्रव्हल व्यावसायिकांचा प्रवास संथच

Patil_p

इन्फोसिसकडून ब्ल्यू अकॉर्नचे अधिग्रहण

Patil_p

स्विगी-झोमॅटो करणार मद्याची होम डिलीव्हरी

Patil_p

पेटीएमचा वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटीच्या घरात

omkar B

दुचाकींच्या किमतीत घट होण्याचे संकेत

Patil_p

9 नोव्हेंबरला ग्लँड फार्माचा आयपीओ

omkar B
error: Content is protected !!