तरुण भारत

ड्रग्ज प्रकरण : कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची छापेमारी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाच्या मुंबईतील घरी एनसीबीने छापा टाकला आहे. तसेच त्यांना समन्स देखील बजावले आहेत. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे. 


गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.


यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याला देखील एनसीबीने छापा टाकला होता. तर अर्जुन रामपालची चौकशी देखील करण्यात आली होती. तर अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली आहे. 

Related Stories

पाकिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वाराचे मशिदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न

datta jadhav

मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्ये मास्क बंधनकारक

prashant_c

आफ्रिकन ‘स्वाईन फ्लू’मुळे 13 हजार डुक्करांचा मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्रात कोविड संदर्भात 81 हजार गुन्ह्यांची नोंद : अनिल देशमुख

pradnya p

बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई मॅक्स रुग्णालयात दाखल

datta jadhav
error: Content is protected !!