तरुण भारत

साडेचार लाखाचा अवैध गुटखा जप्त

सातारा, तळबीड येथे छापे : तिघेजण ताब्यात

प्रतिनिधी/ सातारा/उंब्रज

अवैध गुटख्यावर पोलिसांनी करडी नजर वळवली असून शुक्रवारी दोन मोठय़ा कारवाया झाल्या. यामध्ये सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने तळबीड (ता. कराड) येथे तर शाहूपुरी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनासमवेत साताऱयातील सोमवार पेठेत केलेल्या दोन्ही कारवाईत एकूण 4 लाख 70 हजार 244 रुपयांचा अवैध गुटखा व 3 लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना सोमवार पेठेत अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी सायंकाळी 4 च्या सुमारास तिथे छापा टाकला असता तिथे शाहीद राजमंहमद बागवान (रा. सोमवार, सातारा) हा अवैध विक्री गुटखा विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी शाहीद बागवान यास अटक करत त्याच्या ताब्यातील 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने कॉन्स्टेबल स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, मनोहर वाघमळे व अन्न व औषध प्रशासनाचे इम्रान हवालदार व अस्मिता गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, शुक्रवार, दि. 20 रोजी पहाटे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व पोलीस पथक हे कराड ते सातारा जाणारे हायवेवर गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी उमा महेश हॉटेल व लॉजिंग तळबीड (ता. कराड) येथील मोकळया जागेत एक कार (क्रमांक एम. एच. 12 जी. सी. 506) ही रोडच्या कडेला संशयितरित्या उभी होती. त्यातील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संशय बळावल्याने पोलिसांनी सदर कारची झडती घेतली त्या गुटख्याची पोती होती. पोलिसांनी 3 लाख 37 हजार 990 गुटखा व 3 लाख रुपयांची कार असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वैभव रविंद्र पानसकर, ओंकार अरुण देशपांडे, वाहनमालक संदीप वसंतराव सावंत (तिघेही रा. शनिवारी पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.  याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रोहन राजेंद्र कुमार शहा यांनी तळबीड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली.

या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, अतिष घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, संजय जाधव, पंकज बेसके यांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरू

triratna

सांगली : सुळकाई डोंगर परिसराची स्वच्छता मोहिम

Shankar_P

कोल्हापूर जिल्हय़ात २४ पॉझिटिव्ह

triratna

सातारा : ब्रह्ममुंबई मनपाच्या ऑनलाईन वर्गात मोफत प्रवेश

triratna

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे

triratna

कोल्हापूर : ‘पाचगाव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षामुळे गुन्हेगारीला आळा बसेल’

triratna
error: Content is protected !!