तरुण भारत

आलिमवाडीतील पाणीटाकी जागेबाबत राष्ट्रवादीचा आक्षेप

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेमार्फत परटवणे आलिमवाडी येथे उभारण्यात येणाऱया वादातीत पाणीटाकीच्या जमिन खरेदीसाठी होणारा खर्च 1 कोटी 27 लाख 32 हजार आहे. त्याला टाकावी लागणारी पाईपलाईन असा एकूण खर्च 4 कोटी 27 लाख 32 हजार एवढा आहे. या खर्चाचा आर्थिक भार नाहक नगर परिषदेवर पडून सर्व खर्च जनतेने भरलेल्या विविध करांमधून होणार आहे. याचा गांभिर्याने विचार करून  चुकीची कार्यवाही किंवा पालिकेचे आर्थिक नुकसान होत असेल तर  जिल्हाधिकाऱयांना कळवून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये हे काम रद्द करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

   पंधरामाड येथील टाकीबाबत निर्माण झालेला प्रश्नाबाबत राष्ट्रवादीने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे.  त्याबाबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटये, प्रदेश युवक सचिव बंटी वणजू या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवेदन दिले. पंधरामाड येथील परिसरासाठी पाण्याच्या टाकीबाबत निर्माण झालेला प्रश्न शाळा क्र.20 येथील एखाद्या कोपऱयामध्ये टाकी उभी करून देखील सोडविणे शक्य असल्याचे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी शहरातील परटवणे आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी  27 लाख मोजण्याची गरज नसल्याचे मिलींद कीर यांनी सांगितले आहे.  मात्र या कामासाठी 4 कोटी 27 लाखाचा नाहक खर्च नगर परिषदेवर त्यापोटी पडणार आहे.

  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेमध्ये सुधारित नळपाणी योजना रत्नागिरी नगर परिषदेसाठी मंजूर आहे. खडप मोहल्ला येथील पाण्याची टाकी आणि पंधरामाड येथील टाकीबरोबर असलेले वितरण पाईपलाईन मंजूर आहेत. पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नाहीत म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडे शासकीय जमिनीची मागणी करण्यात आली होती. खडपमोहल्ला येथे सरकारी जमीन उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली. मात्र पंधरामाड येथे असलेल्या टाकीबाबत प्रश्न निर्माण झाला. पण त्या परिसरासाठी उभारण्यात येणारी टाकी शाळा क्र.20 येथील एखाद्या कोपऱयामध्ये देखील उभी करणे शक्य होईल असे म्हणणे आहे. त्यासाठी लागणारी पाईप फाऊंडेशन करता येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळविलेले आहे.

   त्यामुळे परटवणे आलिमवाडीच्या जागेची आवश्यकता नसल्याचेही सांगण्यात आल्याचे मिलींद कीर यांनी सांगितलेय. दिलेल्या पत्रामध्ये आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जागेमध्ये दोन्ही टाक्या काठोकाठ बांधता येतील. त्यासाठी जमिन खरेदीसाठी होणारा खर्च 1 कोटी 27 लाख 32 हजार आहे. त्याला 900 मीटर पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्याची अंदाजित रक्कम तीन कोटी आहे. म्हणजे एकूण खर्च 4 कोटी 27 लाख 32 हजार एवढा आहे. हा खर्च नाहक पालिकेवर पडणार आहे. याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Related Stories

जिल्हय़ातील 360 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाबाबत उत्सुकता शिगेला

Patil_p

दाऊदच्या मुंबकेतील बंगल्यासाठी 11 लाख 30 हजाराची बोली

Patil_p

पुणे विभागातील 5 लाख 37 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

कळंबणी रूग्णालयासमोर निदर्शने सुरु,रिक्त पदांमुळे रुग्णांची होतेय हेळसांड

Shankar_P

दापोलीत तोतया अन्नभेसळ अधिकाऱ्याचा पर्दाफाश

triratna

शेतकरी ते ग्राहक साखळीसाठी ‘विकेल ते पिकेल’ योजना

Patil_p
error: Content is protected !!