तरुण भारत

अमेरिकेत मॉलमध्ये बेछूट गोळीबार; 8 गंभीर जखमी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील एका मॉलमध्ये अज्ञाताने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात आठ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथील मेफिल्ड शॉपिंग मॉलमध्ये अज्ञाताने अचानक गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबारामुळे मॉलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी 75 पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. वाउटोसा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Related Stories

फिलिपाईन्समध्ये 21 हजार कैद्यांची मुक्तता

Patil_p

पॅरिसमध्ये बार, कॅफे बंद

Patil_p

ब्रिटनच्या सम्राज्ञीने बोलाविली तातडीची बैठक

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

ब्राझीलमध्ये 17.21 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

बिल गेट्स यांचा आता समाजकार्याकडे ओढा

tarunbharat
error: Content is protected !!