तरुण भारत

नियमांतील अटींमुळे जलतरण तलाव अद्याप बंदच

खेळाडूंसाठी सूरू करण्याच्या शासनाच्या सूचना

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राज्य शासनाच्यावतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरणपट्टूसाठी जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ मात्र नियमांतील अटींमुळे हे जलतरण तलाव सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत़ अशी माहिती जिल्हा क्रिडा विभागाकडून देण्यात आली आह़े

राज्य शासनाकडून राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूना सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश दिले होत़े मात्र रत्नागिरी तालुक्यात मोजकेच खेळाडू असल्याने हे जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले आह़े सर्वसामान्यांचा सहभाग असेल तरच हे जलतरण तलाव सुरू करणे आर्थिक दृष्टय़ा परवडणारे असल्याचे क्रीडा विभागातील अधिक़ाऱयाकडून सांगण्यात येत आह़े कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 23 मार्च नंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होत़ा यानंतर जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होत़े दरम्यान मिशन बिगीन अंतर्गत सर्व सेवा पूर्ववत सुरू होत असल्या तरी जलतरण तलाव बंदच ठेवण्यात आले होत़े

रत्नागिरी शहराचा विचार करता साळवी स्टॉप येथे शासकीय जलतरण तलाव उभारण्यात आले आह़े याठिकाणी खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळत असत़े गेल्या काही वर्षापासून हे जलतरण तलाव कायमच वादामध्ये सापडले आहेत़

Related Stories

सुरुवातीपासून खबरदारी घेतल्याने कोरोनाची झळ कमी!

NIKHIL_N

वैभववाडी नगराध्यक्षांचा राजीनामा

NIKHIL_N

मेर्वी येथे भर दुपारी पाडीवर वाघाचा हल्ला

triratna

जिल्हय़ातील स्थलांतरीत मजुरांना आवाहन

NIKHIL_N

राष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱया जलतरणपटूंचा सत्कार

Patil_p

रत्नागिरीत कोरोनाचे आणखी 62 रुग्ण

triratna
error: Content is protected !!