तरुण भारत

गुजरात : पाटडीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / गांधीनगर : 


गुजरातमधील पाटडीमध्ये एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक एच पी दोषी यांनी याबाबत माहिती दिली.


ते म्हणाले, मालवण खेरवा जवळील रामापीर मंदिराजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकने इको कारला धडक दिल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता वेळी इको कारला आग लागली आणि कार मधील प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याची शक्यता आहे. आगी इतकी भयानक होती की, मृतांमधील महिला आणि पुरुषांची संख्या ओळखणे अवघड आहे. 


दरम्यान, हे कुटुंब चोटीला देवीचे दर्शन घेऊन घरी येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले आणि त्यांचा तपास सुरू आहे.  

Related Stories

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

Patil_p

बारावी विद्यार्थ्यांना वास्तव्यास असलेल्या भागात इंग्रजीचा पेपर देण्याची व्यवस्था

Rohan_P

अटी आणि शर्थींसह सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल : नितीन गडकरी

pradnya p

कोरोनावरील भारतीय लस स्वातंत्र्य दिनी रुग्णसेवेत

Shankar_P

‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या यूट्यूबर विरोधात बाबांची पोलिसात तक्रार

pradnya p

हिंगणघाट घटना : नवनीत राणांनी लोकसभेत उपस्थित केला मुद्दा

prashant_c
error: Content is protected !!