तरुण भारत

उत्तर प्रदेश : बेकायदा दारू विक्री विरोधात विशेष मोहीम

  • दोषींची संपत्ती होणार जप्त 


ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेश सरकारने बेकायदा व कच्ची दारू तयार करणे आणि तिची विक्री रोखण्यासाठी अबकारी विभागाकडून विशेष टीम तयार करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात 15 दिवस विशेष मोहीम चालवण्याचे आदेश दिले आहेत. 


याबाबत अधिक माहिती देताना अबकारी विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले की, थंडीच्या दिवसांत काही लोक घरामध्येच बेकायदारित्या कच्ची दारू बनवण्याचे काम करतात, हे काम प्रभावीपणे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे हे अभियान चालवण्यात येत आहे. जेणे करून कोणत्याही प्रकारे बेकायदा दारू तयार करणे किंवा तिची विक्री केली जाणार नाही. 


ते पुढे म्हणाले की, या संदर्भात आवश्यक सूचना प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. बेकायदा दारू तयार करणे आणि त्याची विक्री रोखण्याच्या या मोहिमेसाठी अबकारी विभागाची टीम प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांना मदत करणार आहे. तसेच या मोहिमेत कोणी दोषी आढळल्यास संबंधित दोषींची संपत्ती जप्त केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

बाधितांचा उच्चांक : 38,902 पॉझिटिव्ह

Patil_p

कोविड रुग्णालयातील आगीत गुजरातमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू

Patil_p

गोवा राज्यात प्रवेशासाठी मार्ग खुले – मुखमंत्री प्रमोद सावंत

triratna

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

pradnya p

महाराष्ट्रात आजपासून विमानसेवा सुरू

datta jadhav

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाख, वारसाला सरकारी नोकरी

prashant_c
error: Content is protected !!