तरुण भारत

सोमेश्वर उपविभागातील 6 गावांत ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम

ऑनलाईन टीम / बारामती :

महावितरणच्या बारामती विभागांतर्गत येणाऱ्या सोमेश्वर उपविभागातील कुरणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, चोपडज, आंबी बुद्रुक व नारोळी या सहा गावांत महावितरणने शुक्रवारी दिवसभर ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवून विजेच्या समस्यांवर प्रभावी काम केले असून, याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘एक गाव, एक दिवस’ ह्या उपक्रमाची अंमलबजावणी आता राज्यभरात सुरु आहे. अत्यंत नियोजनबद्ध असा हा उपक्रम असून, एकाच दिवशी त्या गावांतील समस्यांवर काम केले जाते. सोमेश्वर उपविभागात शुक्रवारी मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्या उपस्थितीत कुरणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, चोपडज, आंबी बुद्रुक व नारोळी या गावांमधील समस्या निकाली काढण्यासाठी या उपक्रम घेण्यात आला. कंत्राटदारांचे 88 व महवितरणच्या 72 अशा 160 कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या सोबतच सोमेश्वरचे उपविभागीय अभियंता सचिन म्हेत्रे व त्यांच्या शाखा अभियंत्यांनीही मोलाची कामगिरी केली.

या दिवशी सैल तारांना ताण देणे, तारांना लागणाऱ्या फांद्या झाटणे, रोहित्रांची व पेट्यांची दुरुस्ती करणे, फ्यूज बदलणे, केबल बदलणे, कट पॉईंटच्या जंपिंग करणे, झुकलेले खांब सरळ करणे, आवश्यक ठिकाणी स्पेसर्स व ताण बसविणे तसेच नवीन कनेक्शनसह विजेच्या वैयक्तिक तक्रारी दूर करणे अशा बहुतांश समस्यावर काम करण्यात आले. कामाच्या प्रारंभी मुख्य अभियंता पावडे यांनी गावातील वीज ग्राहकांना उपक्रमाची माहिती दिली.

तसेच विजेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करुन वीजबिल भरण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश काकडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप यांचेसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Stories

‘या’ मार्गावरील लोकल 12 ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावर

pradnya p

फळांच्या राज्याची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एपीएमसीमध्ये 50 हजार पेट्यांची आवक

triratna

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

triratna

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर जरूरी : प्रकाश जावडेकर

pradnya p

‘सोलापुरातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास आंदोलन’

triratna

अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानवंदना

pradnya p
error: Content is protected !!