तरुण भारत

मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवारी रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत धाव घेतली आहे. 


रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मनसेकडून त्या निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर अशा भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधून त्या प्रचार करत आहेत. अशातच पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नको’ अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. 


दरम्यान, अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

Related Stories

निर्माते-दिग्दर्शकांवर एनसीबीची छापेमार

Patil_p

कोल्हापूर : ‘हेल्पर्स’मधील वादामागे ‘अर्थ’‘कारण’!

triratna

सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Shankar_P

खा.शरद पवार यांच्यासह मंत्री देशमुख,बनसोडे थेट बांधावर

triratna

कोल्हापूर जिल्हय़ातील पहिला पॉझिटिव्ह कोरोनामुक्त !

triratna

विटा शहरावर आता ‘ड्रोन कॅमेऱ्याची’ची नजर

triratna
error: Content is protected !!