तरुण भारत

जगाला आता अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सची चिंता

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनानंतर जगाला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सची चिंता सतावत आहे. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होते आणि त्यावरील औषध रुग्णाला प्रभावी ठरत नाही. त्यामुळे ही कोरोनानंतरची दुसरी महामारी ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम यांनी म्हटले आहे. 

ट्रेडोस म्हणाले, एखाद्या औषधाची परिणामकता कमी होणे म्हणजे विषाणूची प्रतिकारशक्ती वाढते. विषाणूतील बदलामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारण करू शकते. एखाद्या संक्रमणावर सहज होणारे उपचारही यामुळे होऊ शकणार नाहीत. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे फार नुकसानकारक ठरू शकते.

दरम्यान, यापूर्वी कोरोना रुग्णाच्या बचावासाठी आणि त्याचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिवीर’ औषधाची शिफारस रुग्णालयांनी करू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले आहे. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स एखाद्या महामारीप्रमाणेच जगासाठी धोकादायक आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेश : मेडिकल कॉलेजची महिला चिकित्सक चंदीगडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

बावीस किलो चांदीची वीट ठेवून रचणार राममंदिराचा पाया

datta jadhav

उत्तर कोरिया : टीव्हीवर परदेशातील कार्यक्रम पाहिल्यास क्रूर शिक्षा

datta jadhav

कोरोनाच्या भीतीने बार्शीत विवाहित महिलेची आत्महत्या

triratna

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर रैना म्हणाला…

prashant_c

अमेरिकेच्या कंपन्यांवर चीनकडून बंदी

Patil_p
error: Content is protected !!