तरुण भारत

चार तासांच्या चौकशीनंतर NCB कडून कॉमेडियन भारती सिंहला अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची गेल्या चार ते पाच तासांपासून चौकशी सुरु आहे. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर जवळपास चार तासानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीला अटक करण्यात आली आहे.


या दोघांना एनसीबीने समन्स बजावले होते. एनसीबीने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. भारतीच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळी भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.

 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे. 

Related Stories

धक्कादायक! लॉक डाऊनमध्ये केस कापण्यासाठी नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

pradnya p

मराठी सेलिब्रिटींना क्वॉरंटाईनमध्ये फिट ठेवणारे ब्रायन डिसुझा – रिमा वेंगुर्लेकर

Patil_p

ऍपल-रियलमीसह अन्य स्मार्टफोनच्या किमती वाढल्या

Patil_p

दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या दीड लाख पार

pradnya p

जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करावा

datta jadhav

कोरोना लढा : भारतीय ऑलिम्पिक महासंघाचाही पुढाकार

Patil_p
error: Content is protected !!