तरुण भारत

पुणे विभागातील 4.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :


पुणे विभागातील 4 लाख 94 हजार  830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 22 हजार 983  झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 13  हजार 403 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 34 हजार 511 रुग्णांपैकी  3 लाख 16  हजार  628 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण  9  हजार 721 आहे. कोरोनाबाधित एकूण  8 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.65 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 61  हजार  869 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5लाख  22 हजार 983  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

आरक्षण स्थागितीवरून मराठा समाज रस्त्यावर

triratna

अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीनचिट

Patil_p

ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

pradnya p

बार्शी वाणेवाडी फाट्याजवळ अपघात, 6 जण जखमी

triratna

मान्सून 5 जूनला केरळात

Patil_p

कोकणसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

pradnya p
error: Content is protected !!