तरुण भारत

कोल्हापूरच्या मातीने गमावला अवघ्या आठव्या दिवशी दुसरा वीर

निगवे खालसाचा जवान काश्मीरच्या हल्ल्यात हुतात्मा


प्रतिनिधी / चुये

जम्मू-काश्मीरमधील राजुरी जिल्ह्यात पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा तालुका करवीर येथील जवान संग्राम शिवाजी पाटील वय 36 शहीद झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली 16 मराठा बटालियनच्या पोस्टवरती पाकिस्तानकडून 81 एम एम मोटर सर्च हल्ल्यात संग्राम पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. यावेळी त्यांचा एक सहकारी जखमी झाला. गावचा वीर जवान पाकच्या हल्ल्यात शहीद झाल्याची बातमी गावात समजतात निगवे खालचा गावावरती शोककळा पसरली आहे. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले व भाऊ भाऊ जय असा परिवार आहे.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीच्या ऋषिकेश जोंधळे शहीद झाला होता. त्यानंतर आठव्या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये संग्राम पाटील शहीद झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याला मोठा धक्का बसलेला आहे.

भारतीय सैन्यदलामध्ये भारत मातेची सेवा बजावताना

आठवडाभरात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्याने सर्व थरात पाकिस्तानच्या भ्याड कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजुरी जिल्ह्यातील भारताच्या सीमेवर संग्राम पाटील सेवा बजावत होते. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आपली सेवा पूर्ण करून ते परतत असताना पाकिस्तानच्या हद्दीतून 81 एमएम मोटर सर्च हल्ला करण्यात आला. आणि त्यामध्ये या हल्ल्यात शूरवीर संग्राम पाटील यांना वीर मरण पत्करावे लागले. 

संग्राम शिवाजी पाटील हे 2002 मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाले होते. संग्राम यांचे प्राथमिक शिक्षण गावातील विद्या मंदिर निगवे खालसा येथे झाले. त्यानंतर इयत्ता सातवी ते दहावी मामाच्या गावी येळवडे ता. राधानगरी येथे झाले होते. व अकरावी व बारावी भोगावती महाविद्यालयमध्ये घेतले  देशभक्तीची प्रचंड आवड त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी सैन्यात जाण्याची पूर्वतयारी केली होती. त्यासाठी त्यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारात आपला नावलौकिक केला होता. त्यामुळे त्याला महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच अर्थात अकरावीला भारतीय सैन्य दलामध्ये देश सेवा करण्याची संधी मिळाली होती.  

  सैन्यदलाच्या कुस्ती स्पर्धेत विविध बक्षिसे मिळवून मिळवला लौकिक

सैन्यदलात सोळा वर्षाची सेवा बजावून मे 2020 मध्ये तो निवृत्त होणार होते. मात्र त्या वेळी त्यांनी तो निर्णय रद्द करून आपली सेवा वाढवून घेतली. त्यामुळे त्यांना हवालदार पदावर ती बढती मिळाली होती. त्यामुळे ते 16 मराठा बटालियनच्यावतीने राजुरी जिल्ह्यातील सीमेवरती देश सेवा करीत असताना रात्री हल्ल्यात संग्राम हुतात्मा झाले.

पूर्वभागातील पहिला जवान शहीद

करवीर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हजारो सैनिक आज भारतीय सेंटरमध्ये सेवेत आहेत हजारो सैनिक सेवा बजावून निवृत्त झालेले आहेत. मात्र शत्रूशी लढताना वीर मरण आल्याची घटना घडलेली नव्हती मात्र शनिवारी सकाळी संग्राम पाटील यांच्या वीर मरणाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि निगवे खालसा गावासह परिसरातील नागरिकांना दुर्दैवी घटनेच्या बातमीने सुन्न व्हावे लागेल. त्यामुळे संग्राम यांनी देशासाठी दिलेल्या आहुती बद्दल हळहळ व्यक्त होत आहे. ही मृत्यूची बातमी समजताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवलेले आहेत.
 
 पाकिस्तानच्या कृत्याबद्दल तीव्र संताप

पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या कृत्याने वीर जवान संग्राम यांचा बळी गेला त्यामुळे गावातील युवकांनी पाकिस्तानच्या कृत्याबद्दल तीव्र संतापाच्या भावना व्यक्त करीत निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत. ज्या क्रीडांगणावर संग्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या ठिकाणी पूर्वतयारी करणाऱ्या युवकांनी शहीद संग्राम अमर रहे अमर रहे अमर रहे भारत माता की जय या अभिमानाच्या घोषणा दिल्या तर पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती कळताच दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी गावात भेट दिली. यावेळी त्यांनी संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी कबुतरा बांधकामसाठी तयारी सुरू केली आहे. यावेळी पोलीस उप निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी तसेच बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्रीपती पाटील पंचायत समिती सदस्य सागर पाटील कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे सचिव बी जी पाटील चुयेकर निवृत्त सुभेदार बाबुराव कांबळे यांच्यासह आजी-माजी संघट ना सैनिक संघटनेचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी होणार अंत्यसंस्कार…

शहीद चव्हाण संग्राम पाटील यांचे पार्थिव सोमवारी सकाळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावच्या क्रिडांगणावर  व चबुतरा बांधून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने तयारी सुरू केलेली आहे.

संग्राम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार होता

संग्राम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये ते सुट्टी घेऊन ड्युटीवर हजर झाले होते. दिवाळीच्या सणाला सुद्धा त्यांनी सुट्टी घेतली नाही. देशाच्या रक्षणासाठी सण महत्त्वाचा नसून देशसेवा महत्त्वाची या विचाराने त्यांनी दिवाळीनंतर येण्याचे सांगितले होते. त्यामुळे ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार होते. असे त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून सांगितले होते.

रात्री साडेबारा चा फोन अखेरचा ठरला…

शहीद संग्राम पाटील सीमेवर ड्युटी बजावत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा मित्र सुनील शिंदे याला त्यांनी फोन करून गावाकडची खुशाली विचारली होती. त्यानंतर अवघ्या दीड तासातच काळाचा घाला पडला आणि देशाची सेवा करताना संग्राम धारातीर्थी पडले. त्यामुळे संग्राम यांचा तो फोन मित्रासाठी अखेरचा ठरला.

घराचे स्वप्न अधुरेच राहिले

भारतीय सैन्यामध्ये तब्बल वीस वर्षे सेवा बजावून मे 2021 मध्ये संग्राम निवृत्त होणार होते. पण त्यापूर्वी आपलं सुंदर घर असावे या हेतूने त्यांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले होते. डिसेंबरमध्ये सुट्टी घेऊन ते उर्वरित बांधकाम पूर्ण करणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना वीरमरण प्राप्त झाले, आणि आपले घर पूर्ण करून घर पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

Related Stories

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून अंत्यविधीसाठी 17 शीतशवपेटी प्राप्त

triratna

मुंबई, पुण्याच्या चित्रपट निर्मात्यांना रेड कार्पेट नको

Shankar_P

रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात

Patil_p

नेपाळ मधील गलाई बांधवांची मायदेशाची वाट मोकळी

Patil_p

कोल्हापूर : रक्षाविसर्जनाच्या जेवणातून मानेवाडी येथील 37 जणांना विषबाधा

triratna

जैन सभेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

triratna
error: Content is protected !!