तरुण भारत

तरुण वकिलांनी तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे

जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ बेळगाव

तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने विकास होत आहे. तरुण वकिलांनी कायद्याच्या अभ्यासाबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचीही माहिती घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी सांगितले. येथील कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळविणाऱया चंदगड येथील विजयकुमार बुद्री यांना एम. के. नंबीयार स्मृती सुवर्णपदक देऊन जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी न्यायाधीश सी. एम. जोशी पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव येथील न्यायालयात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आर. एल. लॉ कॉलेजमध्ये एलएलएम कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. अनिल हवालदार, प्रा. पी. ए. यजुर्वेदी आदी उपस्थित होते. चिदानंद पाटील, तृप्ती सडेकर, मेघा सोमन्नावर, अंकिता पाटील, सचिन चव्हाण आदींनी आपले अनुभव सांगितले. अनुजा बेळगावकर यांनी आभार मानले.

Related Stories

पोलीस उपायुक्तपदी मुनवळ्ळीचा सुपुत्र

Patil_p

रविवारपेठेसह बाजारपेठेतील बॅरिकेड्स हटवा

Patil_p

शिवसैनिकांकडून मणगुत्तीत शिवमूर्ती भेट

Patil_p

जि. पं. सर्वसाधारण सभेत अधिकाऱयांविरोधात गंभीर आरोप

Patil_p

कर्नाटक : लॉकडाऊन वाढवू नका – मुख्यमंत्री येडियुरप्पा

triratna

बेंगळूर : एचएएलकडून शासकीय रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका दान

triratna
error: Content is protected !!