तरुण भारत

विद्युत खांबांमुळे रस्ता बनला अरुंद

बेळगाव / प्रतिनिधी

काँग्रेस रोडवरील दुसरे व तिसरे रेल्वेगेटच्या मध्ये रस्त्याच्या बाजूलाच विद्युत खांबच्या रांगा लागलेल्या आहेत. हे विद्युत खांब धोकादायक ठरत असून वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहेत.

   स्मार्ट सिटीअंतर्गत काँग्रेस रोडवर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. हे काम करण्याआधी येथील विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला घेणे आवश्यक होते. मात्र, असे न करता विद्युत खांबच्या बाजूनेच रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे.

   येथील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यात हे विद्युत खांब रस्त्यावरच असल्याने येथील रस्ता अरुंद बनला आहे. त्यामुळे वाहनधारकांना हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. हा विद्युत खांब अडचणीचा ठरत असून वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी स्मार्ट सिटीचे काम स्मार्ट केले असले तरी त्यांच्या कामात स्मार्टपणा नसल्याचे दिसून येत आहे. 

Related Stories

अथणी तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Patil_p

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पूजा

Patil_p

रेल्वे दुपदरीकरण गोव्याच्या विकासासाठीच

omkar B

कर्नाटक: आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

triratna

संभाव्य अतिवृष्टी- महापूराचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा

Patil_p

मजगाव येथील वृध्दा बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!