तरुण भारत

परिवहनचे कर्मचारी ऑक्टोबरच्या वेतनाविना

बेळगाव / प्रतिनिधी

कोरोनामुळे परिवहनच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे परिवहनला कर्मचाऱयांचे वेतन देणे मुश्कील बनले आहे. परिवहनच्या कर्मचाऱयांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांची यंदाची दिवाळी वेतनाविना अंधारातच गेली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन कधी मिळणार, या चिंतेत कर्मचारी आहेत. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी कर्मचाऱयांच्या वेतनासाठी मुख्यमंत्र्यांना 634.50 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार कर्मचाऱयांच्या थकीत वेतनासाठी राज्य शासनाने संमती दर्शविली आहे.

 कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळदेखील अपवाद नाही. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी या खात्यात सेवा बजावणाऱयांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. लॉकडाऊन काळात पाच महिन्यांहून अधिक काळ बससेवा बंद होती. दरम्यान, स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या सर्व बसेस जाग्यावर थांबून होत्या. त्यामुळे खात्याचे उत्पन्नही थांबले होते. त्यानंतर परिवहनने आर्थिक संकटात तोटय़ात बससेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे परिवहनचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खात्यातील कर्मचाऱयांच्या वेतनासाठी परिवहनच्या तिजोरीत रक्कम नाही. त्यामुळे परिवहन आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र, आता परिवहनच्या मदतीसाठी राज्य सरकार धावून आले असून परिवहन कर्मचाऱयांना अर्थखात्याकडून वेतन मंजूर करण्यात आले आहे.

 सर्व निगम-महामंडळांमध्ये बसचालक, कंडक्टर व तांत्रिक कर्मचाऱयांची संख्या 1 लाख 20 हजारपर्यंत आहे. मात्र ऐन दिवाळीत कर्मचाऱयांना वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे. आता कर्मचाऱयांच्या थकीत वेतनासाठी 634 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे परिवहनसह या खात्यात काम करणाऱया कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे. 

Related Stories

सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर रक्कम जमा करा

Patil_p

मिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती

omkar B

उपनोंदणी कार्यालय पुन्हा सीलडाऊन

Patil_p

राज्यसभेसाठी ईराण्णा कडाडी यांचा अर्ज दाखल

Patil_p

बोगस रेशनकार्डधारकांना प्रशासनाचा दणका

tarunbharat

बालोद्यान बनले जनावरांचे कुरण

Patil_p
error: Content is protected !!