तरुण भारत

शहराबाहेरील रस्त्यांवरही भटक्या जनावरांचा अडथळा

बेळगाव  / प्रतिनिधी

शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरात फिरणाऱया भटक्मया जनावरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शनिवारी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर विनायक मंदिरजवळील पेट्रोल पंपासमोर भटक्मया जनावरांचा कळप भर रस्त्यातच ठाण मांडून बसला होता. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. केवळ शहरातच नव्हे तर आता शहराबाहेरील रस्त्यांवरही भटक्मया जनावरांचा अडथळा होताना दिसून येत आहे.

शहराबरोबर उपनगरातही भटक्मया जनावरांची संख्या वाढली असून शहराबाहेरील रस्त्यांवर ही जनावरे अडथळा ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात या जनावरांमुळे अपघात घडण्याची चिंता क्यक्त होत असून या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस या भटक्मया जनावरांचा प्रश्न गंभीर बनत असून बाजारात फिरणाऱया पादचाऱयांसह वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. परिणामी जनावरे पकडण्याची मोहीम थंडावल्याने मोकाट फिरणाऱया जनावरांचा उपद्रव वाढला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ यासह कचरा कुंडय़ांजवळ ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. शहराबरोबर आता शहराबाहेरील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. भटक्मया जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचा जीव धोक्मयात येत आहे. मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात हाती घेतली असली तरी रस्त्यांवर फिरणाऱया जनावरांची संख्या मात्र कमी झालेली नाही. काही वेळेला तर बाजारपेठेत या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराबाहेरील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Related Stories

शिक्षकांच्या वर्क फ्रॉम होमबाबत संभ्रमावस्था

Patil_p

कर्नाटक: हुबळी तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष वॉर रूमची स्थापना

Shankar_P

संविधान म्हणजे भारताचा सर्वोच्च कायदा

Patil_p

चीनच्या राष्ट्रपतींच्या पुतळय़ाचे दहन

Patil_p

कलमठ रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

अपहरण करुन अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ

Rohan_P
error: Content is protected !!