तरुण भारत

बस्तवाड येथे भाताची गंजी जळून खाक : 30 हजाराचे नुकसान

वार्ताहर/ धामणे

बस्तवाड (ह.) येथील शेतकरी भैरू केदारी चौगुले यांच्या शेतातील भात पिकाची गंजी अज्ञातांनी पेटविल्याने भाताची गंजी जळून खाक होऊन सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या शेतकऱयाची शेती शगणमट्टी शिवारात सर्व्हे नं. 49/6 मध्ये असून गेल्या चार दिवसापूर्वी भातपिक कापून याच शेतात गंजी घातली होती. परंतु शुक्रवार दि. 20 रोजी रात्री या गंजीच्या शेजारी बसून दारू पिऊन तेथेच बाटल्या फोडून भाताची गंजी पेटविली असल्याचा संशय असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी समजल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण भैरु चौगुले हा शेतकरी 75 वर्षीय असून बस्तवाड गावात दररोज वृत्तपत्राचे गावभर फिरुन वाटप करतो. बस्तवाड ग्राम पंचायतचे ते 30 वर्षे कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे. अशा गरीब शेतकऱयांच्या हातातोंडाला आलेल्या भातपिकाची गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने येथील नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत असून येथील शतेकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे..

Related Stories

धावत्या कारने घेतला पेट

Patil_p

मराठा मंडळ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल जाहीर

Patil_p

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Patil_p

ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालयाचा एसएसएलसी निकाल 91.07 टक्के

Rohan_P

सव्वापाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

Patil_p

प्रतिटन 2700 रुपये एकरकमी बिल देणार

Patil_p
error: Content is protected !!