तरुण भारत

सहा महिन्यांनंतर पाणीपुरवठा मंडळाला आली जाग

बेळगाव /प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या पाणीगळतीकडे पाणीपुरवठा मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. त्याबाबतचे वृत्त दोन दिवसांपूर्वी तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाणीपुरवठा मंडळ खडबडून जागे झाले. त्यांनी पाण्याची होत असलेली गळती थांबवून दुरुस्ती केली आहे.

 सदाशिवनगर मेन, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागील बाजूस चोवीस तास पाणीपुरवठा असलेल्या जलवाहिनीला सहा महिन्यांपूर्वी गळती लागली होती. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार करूनदेखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले होते.

 मात्र, दैनिक तरुण भारतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच पाणीपुरवठा मंडळ जागे झाले असून या ठिकाणी होत असलेली पाण्याची गळती थांबवून दुरुस्ती करण्यात आली आहे.

Related Stories

एपीएमसी संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला

Patil_p

शास्त्रीनगर येथील नाल्यांची साफसफाई

Patil_p

परराज्यामधून येणाऱया नागरिकांचा ओढा सुरूच

Patil_p

ओमनी कारची अज्ञात वाहनाला धडक

Patil_p

चोर्‍या, घरफोडय़ांच्या सत्राने नागरिक हैराण

sachin_m

बुधवारी बेळगावात पॉझिटिव्ह नाही

Patil_p
error: Content is protected !!