तरुण भारत

रायगडहून परतलेल्या धारकऱयांचे स्वागत

बेळगाव / प्रतिनिधी

32 मण सुवर्णसिंहासन लवकरात लवकर रायगडावर प्रस्थापित व्हावे,  यासाठी बेळगाव येथील धारकरी नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर बेळगाव येथून किल्ले रायगडला रवाना झाले. त्यांनी रायगडावर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व दिवाळीनिमित्त रायगडावर दीपोत्सव साजरा केला.

 यावेळी वाघवडे, धामणे, हलगा यासह अनेक भागातील धारकरी सायकलवरून किल्ले रायगड येथे रवाना झाले होते. ते शुक्रवार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता बेळगावला पोहोचले. शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या धारकऱयांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

 यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, बेळगावातील अनेक गावांतील धारकरी 32 मण सुवर्णसिंहासन व्हावे, यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. यामुळे अभिमान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.   

Related Stories

प्रत्येकामध्ये लेखनाची उर्मी असणे आवश्यक

Patil_p

कोरोना प्रवेशाने निपाणी हादरली

Patil_p

पंधरा लाखाच्या मांडूळ सापाची तस्करी

Patil_p

कुप्पटगिरीत शिवरायांच्या जयघोषात सांगता

Patil_p

दलित समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील

omkar B

हेस्कॉमकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!