तरुण भारत

एल.के.अतिक यांच्याकडून तालुक्यातील कामांची पाहणी

शौचालयासह इतर कामांचे केले कौतुक

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव तालुक्मयातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि अधिकाऱयांना कामासंदर्भात सूचना करण्यासाठी जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी तालुक्मयाचा पाहणीदौरा केला. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना विविध सूचना करून कामासंदर्भात प्रशंसा केली.

हिंडलगा ग्राम पंचायतीसह इतर सरकारी शाळा व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्या या दौऱयात त्यांनी स्वच्छतागृहांसाठी नव्याने आखण्यात आलेली सेफ्टीक टँक ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे पाहून कौतुक केले. याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयांची उपलब्धता करावी, अंगणवाडी शाळांमध्ये विजेची सोय करावी, यासाठी विशेष अभियान राबवा, अशी सूचना अधिकाऱयांना केली.

तालुक्मयात प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणीपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष देण्यासाठी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांना सूचना केल्या. कोणत्याही गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी आतापासूनच विहिरींची खोदाई, पिण्याच्या पाण्याचे पाईप व जलकुंभ यांचा आराखडा तयार करून कामे करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

बेळगाव शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात विविध समस्या आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे सरकारने दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षणाची सोय केली आहे. ग्राम पंचायतींनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांना टीव्ही उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना केली.

यावेळी जिल्हा पंचायतचे उपकार्यदर्शी मुळळ्ळी, अभियंते महादेव बिरादार, तालुका पंचायतीचे सहसचिव राजेंद्र मोरबद, पीडीओ गंगाधर, तांत्रिक संयोजक नागराज यरगुद्दी, तांत्रिक साहाय्यक मालतेश पाटील, ग्रा. पं. प्रभारी सेपेटरी संतोष आदी उपस्थित होते.

मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनीचे केले कौतुक बेळगाव तालुक्मयातील पाहणीदौऱयावेळी एका मराठी माध्यमाच्या मुलीशी जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी इंग्रजीमध्ये संवाद साधला. त्यावेळी त्या मुलीने अतिक यांच्याशी इंग्रजीत बोलल्यानंतर ते अवाप् झाले. एका मराठी माध्यमाच्या मुलीची प्रगती पाहून त्यांनी स्वतः ट्विटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी तालुक्मयातील कामांचेही कौतुक केले आहे.           

Related Stories

शेकडो स्थलांतरित कामगार अडकले कर्नाटकाच्या सीमेवर

Rohan_P

जागेअभावी 220 केव्ही स्टेशनचे काम रखडले

Patil_p

निम्याहून अधिक बाधित झाले कोरोनामुक्त

Patil_p

काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम

Patil_p

विनय कुलकर्णी यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

Patil_p

स्वगृही जाण्यासाठी परप्रांतीय सज्ज

Patil_p
error: Content is protected !!