तरुण भारत

भाजीविक्रेत्या महिलांची निदर्शने

भाजी विक्रेत्या महिलांना हटविलेः शनिवारी समादेवी गल्ली येथे रहदारी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव

समादेवी गल्ली येथील भाजी विपेत्यांवर शनिवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यंदे खुट ते समादेवी गल्लीत रस्त्याच्या कडेला भाजी-फळे विक्री करणाऱया महिलांना भाजी विक्रीस मनाई करत रस्त्यावरून हटविण्यात आले. यामुळे भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईविरोधात वाहतूक पोलिसांविरुद्ध निदर्शने करत भाजी विक्री कोठे करायची, असा संतप्त सवाल केला. कोरोना व लॉकडाऊन यामुळे व्यवसाय अडचणीत आला असतानाच प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे अडचण वाढली असून पर्यायी व्यवस्था करून द्या अन्यथा येथून जाणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शनिवारी समादेवी गल्ली येथे नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला भाजी विक्री सुरू होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी कारवाई सुरू केली. परिणामी सकाळी 5 ते 6 हजार रुपये खर्च करून भाजी घेऊन आलेल्या विक्रेत्यांची अडचण झाली. या ठिकाणी भाजी विक्री करायची नाही असे ठणकावत पर्याय म्हणून वनिता विद्यालयसमोर भाजी विक्री करा, असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्या ठिकाणी भाजी खरेदीसाठी कोण येणार असा प्रश्न उपस्थित करत भाजी विकेत्या महिलांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत भाजी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या आशयाचे निवेदन सादर केले.

मनपा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांची सोय म्हणून ओळखपत्र दिले आहे. ओळखपत्र मिळाल्याने व्यवसाय करणे सोयीचे झाले असे वाटत असताना प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय अडचणीत आला असताना रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. शनिवारचा बाजाराचा दिवस असतानाच सकाळी झालेल्या कारवाईमुळे गैरसोय झाली असून व्यवसाय कसा करायचा आणि खरेदी केलेला भाजीपाला कसा खपवायचा, असा सवाल भाजी विक्रेत्या महिलांनी उपस्थित केला.

संघटनेच्यावतीने निवेदन सादर

रहदारी पोलिसांनी कारवाई करताच येथून जाणार नाही या निर्णयावर ठाम राहत महिलांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र, व्यवसाय करण्यासाठी न्याय मिळणे गरजेचे असून भाजी विक्री करण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना सादर केले. आपला मोर्चा महापालिकेकडे वळवत या ठिकाणीही  आपली समस्या मांडली. आमदार अनिल बेनके यांनाही या आशयाचे निवेदन सादर केले. सदर निवेदनात पर्यायी व्यवस्था करूनच प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलावा, अशी विनंती करण्यात आली आहे. अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे आम्ही व्यवसाय कोठे करायचे आणि पोट कसे भरायचे असा प्रश्न करण्यात आला आहे. यावेळी समादेवी गल्ली भाजी विक्रेत्या संघटनेच्या सदस्या उपस्थित होत्या. 50 हून अधिक भाजी विक्रेत्या महिलांनी विनंतीचे निवेदन सादर केले आहे.

Related Stories

आर्ट्स सर्कलची वार्षिक सर्वसाधारण सभा लांबणीवर

omkar B

इतके बळ कोठून मिळते?

Patil_p

राज्यात पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून प्लाझ्मा बेंगळूरहून चेन्नईला

Shankar_P

वाळू तस्करी-चोरटी दारू अड्डय़ावर धाड

Patil_p

खानापुरात शिवप्रताप दिन साजरा

Patil_p

उगार बुदुक येथे अतिक्रमणावर हातोडा

Patil_p
error: Content is protected !!