तरुण भारत

संरक्षण राज्यमंत्री प्रशस्तीपत्रकाचा प्रथमेश पाटील मानकरी

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचालित राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या एनसीसीचे एसयुओ प्रथमेश पाटील याला 2019-20 सालातील संरक्षण राज्यमंत्री प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्यावतीने खजिनदार बी. एस. कलघटगी यांनी पाटील याचा सत्कार केला.

एनसीसी छात्र एसयुओ पाटील याच्या यशामुळे राणी पार्वती देवी महाविद्यालय आणि 26 कर्नाटक बटालियनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने घेतलेले कष्ट, त्याचा प्रामाणिकपणा व इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याला हे प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे.

एनसीसीमधील विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील सुमारे 26 हून अधिक जणांनी या शिबिरात भाग घेतला होता. गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये एनसीसी महासंचालक प्रशस्तीपत्राने पाटीलला गौरविण्यात आले होते. 26 कर्नाटक बटालियनचा पाटील हा अशा प्रकारचा सन्मान मिळविणारा पहिला सैनिक छात्र आहे. आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अचला देसाई यांनी प्रथमेश पाटील याचे कौतुक केले. 

बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव खजुरिया, एओ कर्नल आदित्य वर्मा, सुभेदार मेजर सी. व्ही. पाटील, महादेव जगताप, आरपीडीच्या एनसीसीचे एएनओ लेफ्टनंट डॉ. एम. एस. कुरणी आदींचे पाटीलला मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.     

Related Stories

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

Patil_p

कोरोनावरील लसीचा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल!

Patil_p

कंग्राळी खुर्द येथील दुर्गामाता दौड उत्साहात

Patil_p

बेळगाव जिह्यातील 23 जणांना कोरोनाची लागण

Patil_p

काळी आमराईत जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Patil_p

मोटारसायकली चोरणाऱया चौकडीला अटक

omkar B
error: Content is protected !!