तरुण भारत

आता राज्यात 24-7 प्राथमिक आरोग्य केंद्रे

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटकात यापुढे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  24ƒ7 पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही माहिती दिली.

येत्या जानेवारीनंतर सरकारी इस्पितळांमध्ये सर्व तपासण्या मोफत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सिटीस्कॅन असो किंवा रक्त तपासण्या असोत त्या मोफत केल्या जाणार आहेत. कोणत्याही औषधांची गरज भासल्यास सरकारच ती औषधे पुरविणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंदे सुरू करण्याबरोबरच रुग्णवाहिकांची सेवा अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी इस्पितळात स्वच्छतेची कमतरता असते, असा आरोप होतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक परिणतीबरोबरच प्रशासकीय कौशल्यही डॉक्टरांनी आत्मसात करावे, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला. खासगी इस्पितळांपेक्षाही सरकार आरोग्य सेवा देण्यासाठी अधिक खर्च करते, तरीही लोकांना उत्तम सेवा का मिळत नाही, याविषयी प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  खासगी इस्पितळांपेक्षाही अधिक उत्तम सेवा देणे शक्मय आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात ऑक्सीजनचा तुटवडा भासला म्हणून सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी कोरोनाच्या काळात धडा मिळाला आहे. 7 कोटी रुपये खर्चातून बेळगाव येथे उभारण्यात येत असलेल्या 350 खाटांच्या सुपरस्पेशालिटी इस्पितळाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प, मनपा आयुक्त जगदीश के. एच., बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी आफ्रीन बानू बळ्ळारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आदी उपस्थित होते.

3 हजार 288 कोरोनाबाधितांवर उपचार

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 3 हजार 288 कोरोना बाधितांवर उपचार करण्यात आले असून 250 हून अधिक कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली आहे, अशी माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली. बिम्समध्ये आतापर्यंत 61 हजारांहून अधिक स्वॅब तपासणी करण्यात आली असून 150 कोरोनाबाधितांवर डायलेसीस करण्यात आले आहे.

अधिकारी धारेवर

डॉ. के. सुधाकर यांनी बिम्समधील अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही बिम्सबद्दल तक्रारी कमी झाल्या नाहीत. बिम्समध्ये अनेक गैरसोयी आहेत. उपचारांविना रुग्णांना परत पाठविण्याचे प्रकारही घडले आहेत. तुमच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल त्यांनी बिम्सचे वैद्यकीय संचालक व बिम्सच्या वैद्यकीय अधीक्षकांना विचारला.   

Related Stories

बेंगळूर: फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ अपलोड करणाऱ्याला अटक

Shankar_P

हिंडलगा ग्रामविकास सुधारणा कमिटीची निवड

omkar B

बाची येथे गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

Patil_p

शिक्षकच करताहेत शाळेची स्वच्छता

omkar B

शहरवासियांचे लक्ष मनपा वॉर्ड पुनर्रचनेकडे

omkar B

रोहन कोकणेची अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Rohan_P
error: Content is protected !!