तरुण भारत

एफसी गोवाची आज सलामीची लढत बेंगलोरशी फातोडर्य़ात

मडगाव

हिरो आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत आज रविवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर यजमान एफसी गोवा संघ आपल्या मोहिमेला सुरूवात करत आहे. आज या स्टेडियमवर नव्या विदेशी फुटबॉलपटूंचा भरणा असलेल्या एफसी गोवाचा सामना बेंगलोर एफसी संघाशी होणार आहे. आयएसएल स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे.

गतवर्षीय लीगमधील विजेत्या एफसी गोवाने अव्वल स्थान मिळवून एएफसीच्या चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला भारतीय संघ म्हणून खेळण्याचा मान मिळविला आहे. आता एफसी गोवाचा संघ एक नवीन संघ म्हणून ओळखला जाणार आहे.

प्रशिक्षक सर्जिओ लोबेराने एफसी गोवाच्या प्रशिक्षकपद सोडल्यानंतर ते आता मुंबई सिटी एफसीचे प्रशिक्षक झाले आहेत. त्याने जाताना आपले भरवशाचे आणि अनुभवी फुटबॉलपटू हय़ुगो बूमोस, मुर्तादा फॉल, अहमद जाहू तसेच मंदार राव देसाई यांनाही नेले आहे.

 मागील दोन मोसमात सर्जिओच्या प्रशिक्षणाखाली एफसी गोवाने नेहमीच आक्रमक खेळ करून आपला दरारा निर्माण केला होता. आता एफसी गोवाचे नवीन प्रशिक्षक स्पेनचे जुआन फॅर्रांडो यांना संघाचा लौकीक सांभाळावा लागणार आहे. एफसी गोवाने नवीन विदेशी तसेच देशी फुटबॉलमध्ये खेळणारे चांगले प्रतिभावंत फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. मागील दोन मोसमात एफसी गोवासाठी खेळणारा मीडफिल्डर एदू बेडियाला एफसी गोवा संघाचे कप्तानपद देण्यात आले असून संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखविला आहे.

आपले प्रतिस्पर्धी बेंगलोर एफसी विरूद्ध तीन गुणांची कमाई करण्यासाठी आज एफसी गोवाला संघर्ष करावा लागणार आहे. बेंगलोर एफसीने यंदा आपला मागील वर्षाचा संघच कायम ठेवला नसून, दर्जेदार अनुभवी फुटबॉलपटूंनाही करारबद्ध केले आहे. दिमास देल्गादो, एरीक पार्तालू, ख्रिस्तियान ओपशेत आणि विंगरच्या स्थानावर ब्राझिलचा क्लिटॉन सिल्वा एफसी गोवाला धोकादायक ठरू शकतात. या दोन्ही संघातील लढतीचा आढावा घेतला तर, कार्लेस कुआद्रातचा बेंगलोर एफसीचा संघ भारी ठरला आहे.

खेळलेल्या सात सामन्यांतून एफसी गोवाला केवळ एकदाच सामना जिंकता आला आहे.

‘मी मागचं काही पहात नाही. एफसी गोवाचा बेंगलोर विरुद्धचा इतिहास मला माहित आहे. मागील सामन्यांत काय घडलयं हे सुद्धा माहीत आहे. पण आता एफसी गोवा हा नवीन संघ आहे. नवी सुरूवात आहे, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅर्रांडो म्हणाले.

Related Stories

थिएमचा नदालला पुन्हा धक्का

omkar B

बाद देणाऱया पंचांशी शुभमन गिलची हुज्जत!

Patil_p

अल्टमायर, गॅस्टन, व्हेरेव्ह, रुबलेव्ह चौथ्या फेरीत

Patil_p

लक्ष्य सेन, शुभंकर डे पात्रता फेरीतच पराभूत

Patil_p

वर्ल्डकपसाठी ‘संकट’, आयपीएलसाठी ‘संधी’!

Patil_p

मुंबईच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

Patil_p
error: Content is protected !!