तरुण भारत

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

पाकिस्तानने आपले मिराज फायटर जेट, एअर डिफेन्स सिस्टम आणि अगोस्टा 90 B या पानबुडींना अपग्रेड करण्यासाठी फ्रान्सकडे मदत मागितली होती. मात्र, फ्रान्सने पाकला मदत करण्यास नकार दिला आहे.

मिराज फायटर जेट भारताच्या डिफेन्सचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानी वंशाच्या टेक्निशियन्सना आपल्या फायटर जेटवर काम करु देऊ नये, असे फ्रान्सने कतारलाही सांगितले आहे. कारण ते फायटर जेट संबंधित टेक्निकल माहिती पाकिस्तानला देऊ शकतात. पाकिस्तान भारताच्या शत्रू राष्ट्रांसोबत ही माहिती शेअर करू शकतो, याची भिती फ्रान्सला आहेच.

याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन यांच्या इस्लामोफोबियावरील वक्तव्यावरुन इम्रान खान यांनी जोरदार टीका केली होती. तसेच पाकच्या रस्त्यांवर फ्रान्सविरोधी निदर्शनेही करण्यात आली होती. त्यामुळेच फ्रान्सने हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येते.

Related Stories

कोविड-19 : नव्या औषधाला मंजुरी

Patil_p

मेंदूवरही प्रभाव पाडतोय कोरोना विषाणू

omkar B

चीन : लसीचा वापर

Patil_p

पुतिन राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता

datta jadhav

पाक सैन्यात अल-कायदासमर्थकांचा भरणा

omkar B

‘या’ राज्यात 5 सप्टेंबरपासून सुरू होणार शाळा

pradnya p
error: Content is protected !!