तरुण भारत

‘कॉमन’मध्येच मोफत वीजेचा मुद्दा नाही

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती

प्रतिनिधी / पुणे

राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन बनविलेल्या किमान समान कार्यक्रमामध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात केवळ इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार समितीचा अहवाल आल्यावर पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत नगरमध्ये ते बोलत होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत सरकारने घूमजाव केल्याने टीका होत आहे. त्यावर तनपुरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. 100 युनिट मोफत देण्याचा विषय कॅबिनेटमध्ये पडताळणी करून पाहण्यास सांगण्यात आले होते. ही वीज माफ करण्याची मंत्री राऊत यांची इच्छा आहे. त्यासाठी समितीदेखील नेमण्यात आली असून, समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही. समितीचा अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. काही दिवसांतील परिस्थिती पाहता मी त्यावर मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. किंबहुना वीज मोफत देण्याची राऊत यांची इच्छा होती व त्यानुसार समितीचे काम सुरू आहे. मात्र, सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जो कॉमन मिनिमम प्रोग्राम केला व ज्या आधारावर हे सरकार बनले, त्यामध्ये असा कुठलाही विषय नव्हता. तथापि, इतर दोन्ही पक्षांना हे मान्य झाले व आर्थिकदृष्ट्या येणारा खर्च सरकारला झेपणारा असेल, तर ते आगामी काळात याबाबत काही होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपानेही त्यांच्या काळात सर्व स्थिती अनुभवली आहे. सरकारला सवलत देणे कितपत शक्मय आहे, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. मात्र, कुणी कुठला मुद्दा उचलावा, हा त्या-त्या पक्षाचा अजेंडा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात 11,852 नवे रुग्ण; 184 मृत्यू

pradnya p

किल्ले सज्जनगड बुरुज स्वच्छता मोहीम फत्ते

triratna

ग्रामविकास मंत्री 16 ऑगस्टला सांगली दौऱ्यावर

triratna

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.10 %

pradnya p

अक्कलकोटमध्ये सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण

triratna

रेल्वेच्या खाजगीकरण विरोधाच्या आंदोलनात सिटूच्या १३८ कार्यकर्ते ताब्यात

triratna
error: Content is protected !!