तरुण भारत

युपीएससी टॉपर टीना डाबीचा घटस्फोटासाठी अर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

युपीएससी टॉपर राहिलेल्या टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. टीना डाबी आणि तिचे पती अतहर आमिर खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही जयपूर कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये न्यायालय यावर सुनावणी करणार आहे. टीना डाबी यांनी  स्वतःच्या तुकडीचे आयएएस अतहर याच्यासोबत 2018 मध्ये विवाह केला होता.

दीर्घकाळापासून वेगवेगळे राहत आहोत. तसेच यापुढे विवाह कायम ठेवण्याची इच्छा नाही, याचमुळे परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे दोघांनीही अर्जात नमूद केले आहे. टीनाच्या पतीने काही महिन्यांपूवीं स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला अनफॉलो केले होते. यानंतर टीनानेही पती अतहरला स्वतःच्या ट्विटरवरुन अनफॉलो केले होते. तसेच टीनाने विवाहानंतरचे स्वतःच्या नावासमोरील खान असा उल्लेख हटविला आहे. याचबरोबर स्वतःच्या इन्स्टाग्राम बायोवरून काश्मिरी सून हा शब्दही हटविला आहे.

दोघेही 2016 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. 2018 मधील दोघांचा विवाह प्रचंड चर्चेत राहिला होता. युपीएससी नागरी सेवा परीक्षेत 2015 मध्ये पहिली आलेल्या टीनाने काश्मिरचा रहिवासी असलेल्या तसेच परीक्षेत दुसरे स्थान प्राप्त केलेल्या अतहरशी विवाह केला होता. सद्यकाळात दोघेही राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत.

Related Stories

आरक्षणासाठी गुर्जर समुदाय आंदोलनाच्या पवित्र्यात

Patil_p

चिनी सैनिक मागे हटले

Patil_p

ग्रंथपालाची परीक्षा रद्द, 6 जण अटकेत

Patil_p

सार्वभौमत्वाशी कदापिही तडजोड नाही

Patil_p

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण माहिती आदानप्रदान करार

Patil_p

कोरोना नियमांच्या अनास्थेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Patil_p
error: Content is protected !!