तरुण भारत

आणखी एका संकटाचा जगाला धोका

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा : अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणे धोकादायक

जिनिव्हा / वृत्तसंस्था

कोरोना प्रादुर्भावामुळे जगातील अनेक देशांमधील परिस्थिती चिंताजनक होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा धोक्मयाचा इशारा दिला आहे. कोरोना महामारीप्रमाणेच अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणे धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडोस अधानोम यांनी म्हटले आहे. जगासमोर कोरोनासारखे आणखी एक संकट येऊन ठेपले आहे. या संकटामुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्मयाची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स हा कोणताही आजार नसला तरी, एखाद्या महामारी एवढाच धोकादायक असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची कसोटी लागू शकते.

अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असे म्हटले जाते. याचा अर्थ स्वत:मध्ये विषाणू बदल करतो. त्यामुळे औषध प्रभावी ठरत नाही. ही परिस्थिती विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्याने उद्भवत असते. वैद्यकीय क्षेत्राचे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे प्रचंड मोठे नुकसान होऊ शकते. स्वत:मध्ये विषाणूने बदल केल्यास औषध त्यासमोर फारसे प्रभावी ठरत नसल्यामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारण करू शकते, अशी भीती टेडोस यांनी व्यक्त केली. माणूस आणि पशूंवर अधिक प्रमाणात औषधांचा वापर होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

पाकिस्तान वाघा बॉर्डरवरून करणार अफगाणिस्तानला निर्यात

datta jadhav

बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 14 ठार

datta jadhav

अमेरिकेत एका दिवसात 912 कोरोना बळी

prashant_c

सायबर हल्ल्याचा धोका

Patil_p

दहशतवादी हल्ल्यांनी हादरले अफगाणिस्तान

Patil_p

हिंसा न थांबल्यास सैन्य तैनात करू

Patil_p
error: Content is protected !!