तरुण भारत

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा मृत्यू

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा या अतिजहाल आणि क्रूर दहशतवादी संघटनेची सूत्रे ज्याच्या हातात होती त्या अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्थानमधील काही सूत्रांकडून या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे. ‘अरब न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार अल जवाहिरी याला दम्याचा त्रास होता. या आजारामुळेच त्याचा मृत्यू ओढवल्याचे बोलले जात आहे. शनिवारपासून समाजमाध्यमांवर यासंबंधीचे वृत्त व्हायरल झाले आहे. मात्र, न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराने ट्विटरवर यासंदर्भात माहिती देताना अल जवाहिरीचा महिन्यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

Related Stories

वुहानमध्ये जनावरांच्या मांस विक्रीला सुरुवात

prashant_c

अमेरिकेत कोरोना लसीची पहिली चाचणी यशस्वी

datta jadhav

चिंताजनक! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे तब्बल 52 हजार रुग्ण  

pradnya p

भेटीच्या माध्यमातून भारत-नेपाळ संबंध सुधारतील!

omkar B

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

datta jadhav

तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे मिळणे शक्य

Patil_p
error: Content is protected !!