तरुण भारत

इंग्लंडमध्ये महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव

ऑनलाईन टीम / लंडन : 

इंग्लंडमधील ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्समध्ये महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव करण्यात आला. अमेरिकेतल्या एका खासगी संग्रहकाने 12 हजार पाऊंड्सना हे घड्याळ खरेदी केले. भारतीय चलनानुसार ही किंमत जवळपास 12 लाख रुपये आहे. घड्याळाचा लिलाव करणारे अँड्र्यू स्टो यांनी यासंदर्भात माहिती दिली.

गांधींचे हे घड्याळ स्विस कंपनीचे असून, त्याला चांदीचा मुलामा आहे. हे मनगटावर घालण्याचे नाही तर खिशात ठेवायचे घड्याळ होते. गांधींचे अनुयायी असलेले कारपेंटर मोहनलाल शर्मा यांना 1994 साली गांधीजींनी हे घड्याळ भेट दिले होते. शर्मा यांनी 1975 साली त्यांच्या नातवाकडे हे घड्याळ सोपविले. या घड्याळाची मालकी त्यांच्या नातवाकडे होती.

दरम्यान, ऑगस्टमध्ये गांधीजींच्या सोनेरी कडा असलेल्या चष्म्याचाही इंग्लडमध्ये लिलाव झाला. या चष्म्याला लिलावात 2 कोटी 55 लाख रुपये किंमत आली.

Related Stories

पेरू देशात आहे कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर

datta jadhav

हनोई येथे सुरू झाले जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल

datta jadhav

रशियात कोरोनाचा संसर्ग वाढताच

Patil_p

चीनची अरेरावी, अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

अमेरिकेत 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c
error: Content is protected !!