तरुण भारत

महानगरपालिकेतर्फे पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

कोरोनांच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करण्यामुळे कारवाई

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात पर्यटन सुरु झाले आहे. तसेच कॅसिनो देखील सुरु झाले असून अनेक देशी, विदेशी पर्यटन गोव्यात दाखल झाले आहे. परंतु सदर पर्यटक कोरोनाची कुठल्याही प्रकारची मार्गदर्शक तत्वांचे पालन करताना दिसत नाही. याच पार्श्वभुमिवर महानगरपालिकेतर्फे कारवाई सुरु केली आहे.

शनिवारी महापौर उदय मडकईकर, उपमहापौर वसंत आगशीकर, व मनपाचे निरीक्षक यांनी स्वतःह विविध ठिकाणी फिरुन मास्क न घालता बिनधास्त फिरणाऱया अनेक पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पणजीतील चर्च स्क्वॅर, कॅसिनो लेन, मिरामार यासारख्या प्रमुख ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून सुमारे 200 पेक्षा अधिक पर्यटकांना दंड ठोकावण्यात आला आहे. यातून 20 हजार पेक्षा अधिक रक्कम गोळा झाली आहे.

आम्ही गेली 3 ते 4 दिवस अशाप्रकारची मोहीम हाती घेतली आहे. पर्यटक गोव्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, परंतु त्यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करने गरजेचे आहे. आम्ही आतापर्यंत अनेक जणांना मास्क न घातल्यामुळे दंड दिला आहे. तसेच बेकायदेशीररित्या पार्क केलेल्या वाहनांवर देखील पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. सदर कारवाई येणाऱया काही दिवसांमध्ये देखील सुरु राहणार आहे. असे महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पर्यटकांसोबत स्थानिक जे मास्क न घालता फिरत आहे त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना मास्क देखील दिले आहे. तसेच कॅसिनो सुरु झाल्याने मोठय़ा प्रमाणात येथे गर्दी झाली आहे. त्यामुळे कॅसिनोंना देखील नविन एसओपी देखील काढण्यात येईल, जेणेकरुन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल. असेही मडकईकर यांनी अधिक बोलताना सांगितले. दरम्यान, बेकायदा वाहने पार्किंगवर  कारवाई करताना आमदार बाबूश मोन्सेरात यांचीही उपस्थिती होती.

Related Stories

अतिवृष्टीमुळे माशेलात भातशेतीवर परिणाम

Patil_p

विधानसभा अधिवेशन घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा घडवावी

Patil_p

आपतर्फे आजपासून विज आंदोलन

Patil_p

गरजूंना साहाय्याबरोबर प्राण्यांचीही सेवा

omkar B

डिचोलीत कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार

Patil_p

तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध जारी

Patil_p
error: Content is protected !!