तरुण भारत

तक्रार कोणतीही असो अगोदर नोंद करा

प्रतिनिधी/ पणजी

तक्रार कसलीही असो ती अगोदर नोंद करून घ्या असा आदेश प्रत्येक पोलिस स्थानकात देण्यात आला असल्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले. बारीकसारीक चोऱय़ा तसेच अन्य छोटय़ामोठय़ा तक्रारी नोंद करून घेण्यास पोलीस मागेपुढे येत असतात. एखाद्या वरीष्ट अधिकाऱयांनी आदेश दिला तरच तक्रार नोंद केली जात असल्याचे आपल्या निदर्शनास आले. असेही पोलीस महानिरीक्षक मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले.

शनिवारी पोलीस मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा आयोजित करण्यात आली होती त्यावेळ पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस उपमहानिरीक्षक परमादीत्य व दक्षिण गोवा अधीक्षक पंकजकुमार सिंग उपस्थित होते. पत्रकारांबरोबर चर्चा करताना पोलीस महासंचालकांनी पोलीस करीत असलेल्या कार्याची माहिती दिली तसेच जनतेला चांगली सेवा देण्यासाठी व पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काय करणार याबाबतही माहिती दिली आहे.

गोव्यात पोलीस महासंचालक पदाचा ताबा स्विकारल्यानंतर राज्यातील जवळजवळ सर्व पोलीस स्थानकांना आपण भेटी दिल्या आहेत. पोलीस स्थानकातील डायरी पाहिली असता अनेक तक्रारी नोंद होत नसल्याचे आपल्याला आढळून आले असल्याने अगोदर तक्रारी नोंद करून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.   गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून इतर राज्याच्या मनाने गोवा खूप शांत आहे. येथे गुन्हेगारही मोजकेच आणि ठरावीक आहेत. पोलीस स्थानकात आलेल्या तक्रारी नोंद करून त्याचा तपास केल्यानंतर संशय़ितांची माहिती पोलीस स्थानकात उपलब्ध राहते त्यामुळे दुसऱयावेळी एखाद्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास लावण्यास मदतही होते असेही मुकेश कुमार मिणा म्हणाले.

पोलीस स्थानकाचा परिसर स्वच्छ असणे महत्वाचे

कोवीड19 काळात पोलिसांनी चांगली कामगीरी बजावली आणि आजही बजावत आहेत. कार्य बजावताना सुमारे 900 पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाला समोरे जावे लागले आहे. कोरोनाचा काळ हा महा कठीण काळ होता त्याही परिस्थितीत पोलिसांनी कार्यतत्पर्ता दाखविली आहे. मास्क वापरणे किंवा सामाजीक अंतर पाळणे याकडेही पोलीस लक्ष देत आहेत. पोलीस कर्मचारी निरोगी रहाण्यासाठी त्यांनी काही गुणांचे पालन करणे महात्वाचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता पोलीस स्थानकाना आपण भेट दिली तेव्हा अनेक पोलीस स्थानकातील परिसर अस्वच्छ असल्याचे आढळून आलेने पोलीस स्थानकातील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. आपण केव्हाही पोलीस स्थानकात आल्यास पोलीस स्तानकातील परीसार स्वच्छ असायला हावा असेही बजाविल्याचे मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले.

सरकारी कामात बादा आणणाऱयांची गय नाही

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस चांगल्या पध्दतीने आपले काम बजावत आहेत. विविध विषयांसाठी होणारी आंदोलनेही चांगली हाताळी  जात आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने ज्या प्रक्लपाना मान्यता दिलेली आहे. ते प्रकल्प राज्य किंवा देशाच्या विकासासाठीच असतात. एखादा प्रकल्प हातात घेण्या अगोदर त्याच्या सर्वबाजून पडताळून पहाण्याचे काम संबंधीत खाते करीत असते. त्यामुळे सरकारच्या प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱयांची गय केली जाणार नाही असेही पोलीस महासंचालकांनी सांगितले. जनतेलाही आपली विनंती आहे की त्यांनी सरकारी कामात बादा आणू नये. असेही मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले.

ड्रग्स पुरविणाऱयांपर्यंत पोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न

कोरोना बाधीतांची संख्या राज्यात वाढू नये म्हणून काही गोष्टींचे पालन करणे फार महत्वाचे आहे. पर्यटन व्यवसायासाठी सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन होणे महत्वाचे आहे. अन्यथा कारवाई करणार. बेकायदेशीर पाटर्य़ांचे आयोजन होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. गोवा हे पर्यटक स्थळ असल्याने येथे मोठय़ाप्रमाणात देशी विदेशी पर्यटक येत असतात. अमली पदार्थाचा बेकायदेशीर व्यवसाय होत असला तरी पोलीस वेळोवेळी कारवाई करीत असतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी मोठय़ा प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आला असून अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स पुरविणाऱयां मुख्य संशय़ितांपर्यंत पोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कुठेही बेकायदेशीर ड्रग्स व्यवसाय होत असल्याच लोकांनी पोलिसांनी कळवावे त्वरीत कारवाई केली जाईल. राज्या अनेक युवक ड्रग्सच्या आहारी गेले असल्याचे आढळून आले आहे. पेलकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे असेही मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले.

राज्यातील विविध महाविद्यालयात अनेक प्रकरणे होत असून प्रध्यापकांना धमकाविण्याचेही प्रकार होत आहेत. पोलीस या साऱया प्रकारांवर लक्ष देऊन आहे. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांशी संपर्क करून महाविद्यालायातील परिस्थितीचा आढवा घेतला जात आहे. गरज भासल्यास प्रध्यापकांना पोलीस संरक्षणही दिले जाईल असेही मुकेश मुकामार मिणा म्हणाले.

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षेची आज होणार सांगता

Patil_p

मोफत दूध घेण्यासाठी धावपळ-गोंधळ

Patil_p

मराठा मंदिर येथे आज धरणे आंदोलन

Patil_p

बेळगाव जिह्यातील आणखी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Rohan_P

नको एंट्री, नको खुशाली, फक्त उस दाखवा, तोड घ्या

Patil_p

बेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!