तरुण भारत

रत्नागिरी : तळवडेतील रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

प्रतिनिधी / लांजा

लांजा- तळवडे- कुरुचुंब- दाभोळे मार्गावर तळवडे फाटा येथे रस्ता मधोमध खराब झाला आहे. यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे तळवडे खराब झालेला हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे.

लांजा- तळवडे- कुरुचुंब- दाभोळे हा मार्ग साखरपा पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला असल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. लहान वाहनासह अवजड वाहने या मार्गावरून धावत असतात. सध्या लांजा तालुक्यातून कोल्हापूर, सांगलीच्या दिशेने अवजड ट्रकच्या सहाय्याने चिरे वाहतूक होत आहे. पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र तळवडे फाटा या ठिकाणी खराब झालेला हा रस्ता मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. यापूर्वी येथे किरकोळ अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच रस्ता डांबर व खडी टाकून व्यवस्थित करावा, अशी मागणी वाहनचालक, नागरिक, प्रवाशांमधून केली जात आहे.

Related Stories

रत्नागिरी : कोकण मार्गावर उद्यापासून ‘गांधीधाम-तिरुनेवल्ली फेस्टिवल’ धावणार

triratna

रत्नागिरी : गुहागरात कोरोना रूग्णसंख्या घटल्याने दिलासा

triratna

कृत्रिम शेल्टरमध्ये नानाविध माशांचा अधिवास

NIKHIL_N

रत्नागिरीतून धावणार आजपासून एसटी

Patil_p

संगमेश्वरच्या व्यापाऱयांसाठी भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार मैदानात

Patil_p

आणखी चौघांचा मृत्यू, नवे 96 रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!