तरुण भारत

आयुर्वेदिक डॉक्टरांनाही करता येणार शस्त्रक्रिया

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

आयुर्वेदिकची पदवी असलेल्या डॉक्टरांना जनरल आणि ऑर्थोपेडिक सर्जरीसोबत आता डोळे, कान आणि घशाचीही सर्जरी करता येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाला भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेनेही हिरवा कंदील दिला आहे.

आयुर्वेदिकच्या अभ्यासक्रमात शस्त्रक्रियेचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत माहितीही दिली जात होती. मात्र, त्यांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी नव्हती. केंद्र सरकारने याबाबत नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार आयुर्वेदिकची पदवी असलेल्या डॉक्टरांना ऑर्थोपेडिक सर्जरीसोबत डोळे, कान आणि घशाची शस्त्रक्रिया करता येईल.

आयुर्वेदिकच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे हे डॉक्टर ग्लुकोमा, मोतीबिंदू, स्तनांमधील गाठी, अल्सर आणि पोटाच्या त्वचेसंदर्भातील काही सर्जरी करू शकतील.

Related Stories

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्वारंटाईन सक्तीचे

Patil_p

देशात 64,399 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सौदी अरेबिया शस्त्रास्त्रांचा मोठा आयातदार

tarunbharat

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचणी मोफत करा

Patil_p

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

pradnya p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 1,555 नवे कोरोना रुग्ण, 51 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!