तरुण भारत

कोरोनाला पुन्हा गती, नवे 80 रूग्ण

प्रतिनिधी/ सांगली

जिल्हय़ात पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढीला गती मिळाली आहे. ही चिंतेची बाब आहे. शनिवारी जिल्हय़ात नवे 80 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात आठ रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 72 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या आठवडय़ात सरासरी 25 ते 35 असे दररोज रूग्ण वाढत होते. पण गेल्या दोन दिवसापासून मात्र रूग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. ही सरासरी आता 70 ते 80 वर आली आहे. त्यामुळे जिल्हय़ात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी जिल्हय़ात नवीन 80 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात आठ रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात सात रूग्ण वाढले तर मिरज शहरात एक रूग्ण वाढला आहे.

ग्रामीण भागात 72 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ, कडेगाव तालुक्यात दोन, खानापूर तालुक्यात सात रूग्ण वाढले. पलूस तालुक्यात चार तर तासगाव तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 10, कवठेमहांकाळ तालुक्यात सहा तर मिरज तालुक्यात 13 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात 12 रूग्ण वाढले आहेत. शनिवारी शिराळा तालुक्यात मात्र एकही रूग्ण वाढला नाही.

उपचार सुरू असताना दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील एकाचा आणि जत तालुक्याचा एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हय़ात एक हजार 688 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारात 408 रूग्ण आहेत. शनिवारी 53 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हय़ात 46 हजार 422 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 44 हजार 326 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ातील कोरोनामुक्तीचा दर हा 95 टक्केपेक्षा अधिक आहे.

s शनिवारी जिल्हय़ात चार हजार 893 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीच्या माध्यमातून 698 जणांचे स्वॅब तपासले आहेत. तर चार हजार 195 जणांची रॅपीड ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे.  यामध्ये 80 रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Related Stories

दिलासादायक : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 टक्के

pradnya p

triratna

जमत नसेल तर सत्ता सोडा,चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

triratna

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 291वर

Shankar_P

बार्शीतील ‘त्या’ शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मिटला

Shankar_P

कोकणातील जांभा दगड चिरेखाणींना, आठ दिवसात परवानगी

Shankar_P
error: Content is protected !!